मान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 04:22 PM2019-01-07T16:22:22+5:302019-01-07T16:25:55+5:30

यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादामध्ये काहीजण अनावश्यकपणे शासनाला खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Involvement of dignitaries is related to organizers, not State Government - Vinod Tawde | मान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही - विनोद तावडे

मान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही - विनोद तावडे

Next

मुंबई - यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादामध्ये काहीजण अनावश्यकपणे शासनाला खेचण्याचा प्रयत्न करीत आहे. पण यामध्ये राज्य शासनाचा काहीही संबंध नाही, असे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.

यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कोणाला उद्घाटक म्हणून निमंत्रण द्यायचे, संमेलनात कोणती सत्र असावीत, कोणाची भाषणे व्हावीत, संमेलनामध्ये कोणती कवी संमेलन व्हावीत आदी सर्व विषय हा साहित्य महामंडळ आणि त्यांच्या समित्या ठरवित असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देणे वगळता यामध्ये शासनाचीही कोणतीही भूमिका नसते आणि संमेलनाच्या कुठल्याही निर्णयामध्ये राज्य शासन हस्तक्षेप करत नाही. संमेलनाचे संपूर्ण वेळापत्रक हे आयोजकामार्फत ठरविण्यात येते. त्यामुळे विनाकारण संमेलनाच्या सध्याच्या वादात राज्य सरकारला खेचण्याचा प्रयत्न करु नये, असे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.  

यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उदघाटक म्हणून निमंत्रण देण्याचा आणि नंतर ते परत घेण्यावरुन वाद सध्या सुरु आहेत. यासंदर्भात कालपासून विविध माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. यासंदर्भात राज्य शासनाची भूमिका श्री. तावडे यांनी स्पष्ट केली.

Web Title: Involvement of dignitaries is related to organizers, not State Government - Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.