आवक कमी असल्याने उडदाचे दर ११ हजारांवर
By admin | Published: November 18, 2015 03:22 AM2015-11-18T03:22:39+5:302015-11-18T03:22:39+5:30
यावर्षी पाऊस कमी झाल्याने मूग, उडदाचे उत्पादन प्रचंड घटले. कमी कालावधीत येणाऱ्या उडीद, मुगाची आवक ही तीन ते चार हजार क्ंिवटलच्या वर असायची. आजमितीस राज्यात दुसऱ्या
अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने मूग, उडदाचे उत्पादन प्रचंड घटले. कमी कालावधीत येणाऱ्या उडीद, मुगाची आवक ही तीन ते चार हजार क्ंिवटलच्या वर असायची. आजमितीस राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाची दररोज सरासरी ३५ ते ४० क्ंिवटल आवक असून, दर प्रतिक्ंिवटल अकरा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
मूग, उडीद हे कमी कालावधीत येणारे महत्त्वाचे पीक आहे; परंतु सलग पाच ते सात वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेचा फटका या पिकाला बसत असल्याने शेतकऱ्यांनी मूग, उडिदाचा पेरा कमी केला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये या खरीप हंगामात मूग ७०,८०० हेक्टर, तर उडीद ४५,९०० हेक्टर क्षेत्रावर पेरण्यात आला होता; परंतु यावर्षीही झालेल्या अल्प पावसाचा फटका पिकांना बसल्याने एकरी २० ते ५० किलो उत्पादनच हाती आले आहे.
मागील सप्टेंबर महिन्यात २,७९७ क्ंिवटल उडिदाची आवक झाली होती. आॅक्टोबरमध्ये २,५६८ क्ंिवटल आवक होती. आजमितीस या आकड्यात घसरण झाली आहे. मुगाची आवक संपूर्ण आॅक्टोबरमध्ये ४,१४५ क्ंिवटल होती. आता नोव्हेंबर महिन्यात घसरण झाली असून, प्रतिदिन ८० ते ९० क्ंिवटल आवक आहे. मुगाला प्रतिक्ंिवटल ७,९०० ते ८,२०० रुपये दर आहेत. तुरीची १७ नोव्हेंबर रोजी ६१ क्ंिवटल आवक झाली होती, तर दर ८,३०० ते ९००० हजार रूपये प्रतिक्ंिवटल होता.
दरम्यान, उडिदाला ४ नोव्हेंबर रोजी ९,८०० ते १०,८०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. ६ तारखेला ९,२०० ते १०,५०० रुपये, ७ नोव्हेंबरला ९,५०० ते १०,००० रुपये, तर १६ नोव्हेंबरला १०,००० ते ११,२०० आणि १७ नोव्हेंबरला ९,८०० ते ११,००० रू पये दर होता. जशी आवक घटत आहे, तसे दर चढत असल्याचे या आकड्यांवरू न लक्षात येत आहे.
मूग, उडिदाची आवक अपेक्षेपेक्षा कमी असून, उडिदाला प्रतिक्ंिवटल ११,००० रुपये, तर मुगाला ८,२०० रुपये दर मिळत आहे.
-सुनील मालोकार, सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, अकोला.