सोलापुरात बाजार समितींमधील आवक मंदावली
By admin | Published: June 5, 2017 02:34 PM2017-06-05T14:34:26+5:302017-06-05T15:57:10+5:30
सोलापुरात शेतक-यांनी 100 टक्के बंद कडकडीत बंद पाळला.
आॅनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 5 - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील चार दिवसांपासून राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे. मुंबई वगळता महाराष्टातील शेतकऱ्यांनी सोमवार ५ जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात हा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. वेळापूर येथे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून रास्ता रोको आंदोलन केले. शिवाय मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून पुणे -सोलापूर या महामार्गावरची वाहतूक रोखून धरली़. याशिवाय शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसेना, शेतकरी संघटना यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन, दूध ओतणे, भाजीपाला फेकून दिला आहे़
सोलापूर जिल्ह्यातील संपावर एक नजर
- दूध पंढरी दूध संकलन करणार नाही आज, दुध पंढरीचा बंद पाठिंबा आहे.
- मोहोळ शहरा सह तालुक्यात कडकडीत बंद
- माळशिरस परिसरातील सर्व गावात अत्यावश्यक सेवा वगळता शांततेत बंद सुरू
- मोङनिंब कङकङीत बंद
- करकंब मधील गोकुळ दूध हे दूध संकलन केंद्र आज चालू असल्यामुळे शेतकऱ्यांनी जमा केलेले दूध सोडून निषेध व्यक्त केला आणि दूध केंद्र बंद पाडले.
- महाराष्ट्र बंद मध्ये नेमतवाडी सारख्या ग्रामीण भागातील सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवून पाठिंबा दर्शविला आहे
- करमाळयात कडकडीत बंद,आडत बाजार,भाजी बाजारात मालाची आवक नसल्याने बाजारात शुकशुकाट, दूध संकलन केंद्र बंद,व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन पांठिबा दिला आहे.
- जेऊर चा आठवडी बाजार बंद मुळे भरलेला नाही.भाजी विक्रेते व बाजारकरूची बाजाराकडे पाठ फिरवली आहे.
- केम मध्ये १०० टक्के बंद पाळण्यात आला आहे.
- तुंगत येथील शेतकरी संपास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी सर्व व्यावसायिक बंधूनी आपली दुकाने व व्यापार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
- करमाळा तालुक्यातील कंदर सह परिसरातील सतोली,कवीट गाव,वडशिवणे,बिटरगाव,पांगरे,या गावात सर्व दुकाने बंद करून शेतकरी संपास पाठिबा दिला
- टेंभुर्णी शहरात कडकडीत बंद. मार्केट यार्ड, भाजीमंडई मध्ये शकशुकाट, मेडीकल स्टोअर्स वगळता किराणादुकाने, मशिनरी दकाने, दुचाकी व चारचाकी वाहणांची शोरूम तसेच छोट्या मोठ्या व्यावसायाकांनी आपली दकाने बंद ठेवून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठीबा दिला. यामुळे मार्केट यार्डसह सर्व व्यापारी पेठेत शकशुकाट आह.
- मरवडे गावात सर्व ठिकाणी शुकशुकाट असून बाजारपेठ बंद ठेवत मरवडेकरांनी महाराष्ट्र बंदला पाठींबा दिला आहे.
- मंगळवेढा शहरासह तालुक्यातील सर्व गावात कडकडीत बंद
- कोंढार चिंचोली. ता.करमाळा. येथे शेतकरी संघटनेचे वतीने दुध.रस्त्यावर ओतून.गामस्थांनि.शेतकरी संपामध्ये सहभाग घेतला
- लऊळमध्ये १०० टक्के कडकडीत बंद .शेतक-यांनी केला अचानक रस्ता रोको पोलीसांची उडाली धावपळ.
- कामती बु येथे आज दुपारी ११ वाजता सोलापूर मंगलवेढा रस्त्यावर शिवसेने च्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़
- कुरूल कामती कोरवली आदि बहुतेक गावे १०० टक्के महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी, सर्व व्यवहार बंद
- मालवंडी ता.बार्शी येथे शेतकरी संप कांदे बटाटे वांगी भाजे पाल्या रस्त्यावरओतुन आठवडा बाजार १००% बंद ठेवुन शासनाचा जाहिर निषेध