आयपीसीत सिमरन केस्सर पहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 04:44 AM2018-01-29T04:44:14+5:302018-01-29T04:44:29+5:30
इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाउंटस आॅफ इंडिया (आयसीएआय) तर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटन्टस इंटरमिडिएट म्हणजे आयपीसी परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २६.७२ टक्के लागला असून मुंबईची सिमरन केस्सर राज्यात पहिली तर देशात तिसरी आली आहे.
पुणे : इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाउंटस आॅफ इंडिया (आयसीएआय) तर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटन्टस इंटरमिडिएट म्हणजे आयपीसी परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २६.७२ टक्के लागला असून मुंबईची सिमरन केस्सर राज्यात पहिली तर देशात तिसरी आली आहे.
आयपीसी परीक्षा नोव्हेंबरमध्ये झाली होती. अहमदाबाद येथील जय सेठ हा विद्यार्थी ७५.७१ टक्के गुणांसह देशात पहिला आला असून कोलकात्याचा सुसर्ला जयराम हा ७५.१४ टक्के गुणांसह दुसरा आला. या परीक्षेतील ग्रुप एकअंतर्गत ७२ हजार १४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर ग्रुप दोनमधून परीक्षा ६५ हजार ३९३ इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दोन्ही ग्रुपमधून १३ हजार १४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण ४९ हजार २१५ विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली होती.