आयपीएलचे मेमधील सामने महाराष्ट्राबाहेर !

By admin | Published: April 14, 2016 04:18 AM2016-04-14T04:18:40+5:302016-04-14T04:18:40+5:30

राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईची भीषण परिस्थिती लक्षात घेता सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या स्पर्धेचे मे महिन्यांत होणारे सामने महाराष्ट्रात न खेळविण्याचा

IPL matches in front of Maharashtra! | आयपीएलचे मेमधील सामने महाराष्ट्राबाहेर !

आयपीएलचे मेमधील सामने महाराष्ट्राबाहेर !

Next

मुंबई : राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईची भीषण परिस्थिती लक्षात घेता सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या स्पर्धेचे मे महिन्यांत होणारे सामने महाराष्ट्रात न खेळविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.
सरकारने जरी बघ्याची भूमिका घेतली असली, तरी राज्यातील पाणीटंचाईकडे आम्ही डोळेझाक करू शकत नाही, अशी चपराक राज्य सरकारला हाणत, न्या. विद्यासागर कानडे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला. न्यायालयाला हरप्रकारे समजवू पाहणाऱ्या बीसीसीआय, एमसीए आणि आयोजकांना यामुळे मोठा दणका बसला आहे. सहभागी संघांनी केलेली मोठी गुंतवणूक व ऐनवेळी सामने अन्यत्र भरविण्यातील व्यवहार्य अडचणींची दखल घेऊन न्यायालयाने आयोजकांना पर्यायी जागी तयारी करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला व ३० एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर नेण्याचा आदेश दिला.


नागपूर
७ मेपंजाब वि. दिल्ली
९ मेपंजाब वि. बंगळुरू
१५ मेपंजाब वि. हैदराबाद

पुणे
१ मेपुणे वि. मुंबई
१० मे पुणे वि. हैदराबाद
१७ मेपुणे वि. दिल्ली
२१ मेपुणे वि. पंजाब
२५ मेपहिली एलिमिनेटर
२७ मेक्वालिफायर


‘पाणी वितरणाबाबत सरकारने धक्कादायक भूमिका घेतली. पाणी नियोजनाची जबाबदारी महापालिका आणि जलसंपदा प्राधिकरणाकडे असली, तरी सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. स्वतंत्रपणे उपाययोजना आखणे आवश्यक आहे. - उच्च न्यायालय

या निर्णयाचे मी स्वागत करतो. पण राज्य सरकारने पुढाकार घेऊन व आयपीएल आणि बीसीसीआयच्या सहकार्याने हे सामने राज्याबाहेर गेले असते तर अधिक आनंद झाला असता.
-सुरेंद्र श्रीवास्तव,
जनहित याचिकाकर्ते

Web Title: IPL matches in front of Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.