IPL - मुंबई, पुणे संघ दुष्काळग्रस्तांना करणार मदत
By admin | Published: April 13, 2016 05:08 PM2016-04-13T17:08:48+5:302016-04-13T17:46:23+5:30
बीसीसीआयने न्यायालयात दुष्काळग्रस्तांना पाच कोटींची मदत करणार असल्याचीही माहिती दिली. याशिवाय, लातुरमधील कोणत्याही दुष्काळाग्रस्त भागात ४० लाख लीटर पाणी पुरविण्याची तयारी यावेळी बीसीसीआयने दाखवली.
Next
- मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी ५ कोटी तर मैदानासाठी वापरण्यात येईल तितके पाणी दुष्काळग्रस्तांना देणार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - IPL मधील मुंबई , पुणे हे संघ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी ५ कोटी देणार असल्याचे पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे महाराष्ट्रात आयपीएल स्पर्धेचे सामने खेळवण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यानन्यायालयात सांगितले. बीसीसीआयने न्यायालयात दुष्काळग्रस्तांना पाच कोटींची मदत करणार असल्याचीही माहिती दिली. याशिवाय, लातुरमधील कोणत्याही दुष्काळाग्रस्त भागात ४० लाख लीटर पाणी पुरविण्याची तयारी यावेळी बीसीसीआयने दाखवली. मात्र, महाराष्ट्रातील सामने इतरत्र खेळवण्याविषयी मौन बाळगले.
दरम्यान, नागपूरातील सामने अन्यत्र हलवण्याबाबत विदर्भ क्रिकेट असोसिएशनबोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असेही बीसीसीआयने सांगितले. या सुनावणीदरम्यान पुणे संघाच्या वकिलांनी त्यांच्या संघाचे सामने पुण्याबाहेर खेळविण्यास विरोध दर्शवला. हे सामने इतरत्र खेळवले गेल्यास संघाचा पाठिंबा कमी होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला. आयपीएलची तिकीटे विकली गेली आहेत. याशिवाय, आयपीलमध्ये अनेक गुंतवणुकदारांचे व्यावसायिक हितसंबंध जोडले असल्याने आयपीएल सामने महाराष्ट्राच खेळवून देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी बीसीसीआयने केली.
क्रिकेट संघटनांमध्ये सल्लागार म्हणून फक्त राजकारण्यांचीच वर्णी कशी काय लागते?, या राजकारण्यांशिवाय क्रिकेट संघटनांचा कारभार चालू शकत नाही का, असा खडा सवाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला विचारला.
न्यायालयाने यावेळी बीसीसीआयकडून एमसीएला इतर संघटनांच्या तुलनेत देण्यात येणाऱ्या अधिक प्राधान्याचा मुद्दाही उपस्थित केला. याशिवाय, एमसीएने त्यांच्या उत्त्पन्न आणि खर्चाचा तपशील जाहीर करावा, असे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले.