IPL महाराष्ट्रात खेळवण्यासाठी MCAची सर्वोच्च न्यायालयात धाव
By admin | Published: April 22, 2016 12:16 PM2016-04-22T12:16:47+5:302016-04-22T12:17:36+5:30
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनने व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी येत्या सोमवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने न्यायालयाने ३० एप्रिलनंतर महाराष्ट्रात आयपीएलचे सामने खेळवायला मनाई केली होती. मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने १ मे रोजी पुण्यातील एमसीएच्या स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळवायला परवानगी दिली. एका दिवसात विशाखापट्टणमला सोय करणे कठीण आहे, असे म्हणत बीसीसीआयने १ मेचा सामना पुण्यामध्येच खेळण्याची परवानगी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाकडे मागितली होती, त्यावर सुनावणी करताना न्यायालायने हा सामना पुण्यात खेळू देण्यास परवानगी दिली होती.
त्यामुळे या सामन्याप्रमाणेच उर्वरित सामनेही राज्यात घेऊ देण्यास परवानगी मिळावी अशी मागणी करत मुंबई व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.