खंडणीप्रकरणी इक्बाल कासकरला अटक, ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 05:02 AM2017-09-19T05:02:09+5:302017-09-19T05:02:11+5:30

बांधकाम व्यावसायिक जग्गू खेतवानी यांच्याकडे चार सदनिकांपेक्षा अधिक सदनिकांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सोमवारी रात्री उशिरा भायखळा येथून अटक केली. त्याच्यासह अन्य तीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले

Iqbal Kaskar arrested for ransom, Thane anti-racket squad action | खंडणीप्रकरणी इक्बाल कासकरला अटक, ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई

खंडणीप्रकरणी इक्बाल कासकरला अटक, ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई

Next

ठाणे : बांधकाम व्यावसायिक जग्गू खेतवानी यांच्याकडे चार सदनिकांपेक्षा अधिक सदनिकांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सोमवारी रात्री उशिरा भायखळा येथून अटक केली. त्याच्यासह अन्य तीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
ठाणे येथील खंडणीविरोधी पथकात चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांची अलीकडेच नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कासकर याला अटक करून मोठी कारवाई केली आहे. कासकर याने ठाण्यातील बिल्डर खेतवानी यांच्याकडून खंडणीपोटी चार सदनिका वसूल केल्या होत्या. मात्र, त्याची भूक काही कमी न झाल्याने व तो आणखी सदनिकांची मागणी करत असल्याने बिल्डरने कासारवडवली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, शर्मा यांनी भायखळा येथील कासकरच्या घरी तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. कासकरला अटक करण्यासाठी तब्बल ४0 पोलीस, ८ कमांडो आणि बुलेटप्रुफ गाड्यांचा ताफा पोलिसांनी वापरला होता.
खेतवानी यांनी ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गृहप्रकल्प उभारला होता. या प्रकल्पाच्या जागेसंदर्भात वाद होता. या वादातूनच खेतवानी यांना खंडणी मागण्यात आली होती.
कासकर हा २००३ पर्यंत दुबईत वास्तव्य करीत होता. १९ मार्च २००३ रोजी त्याला विमानतळावर अटक करून त्याला मोक्का लावण्यात आला. दाऊदचे रिअल इस्टेटमधील व्यवहार सांभाळणाºया कासकरची २००७ मध्ये वेगवेगळ््या आरोपांतून पुराव्याअभावी मुक्तता झाली. २०१० मध्ये छोटा राजन टोळीने त्याच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, तो पोलिसांनी उधळला. भेंडीबाजार येथील पाकमोडिया स्ट्रीटवरील हुसैनी इमारत कोसळल्यानंतर भायखळा येथील डाबरवाला ही धोकादायक इमारत रिकामी करण्याचे आदेश महसूल विभागने दिले होते. त्यातच इमारतीत कासकर हा बेकायदा राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Iqbal Kaskar arrested for ransom, Thane anti-racket squad action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.