मंत्रालयातील खिडक्यांवर लागणार आता लोखंडी ग्रील! ‘शोले स्टाईल’आंदोलनाची परिणती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 08:34 PM2017-11-19T20:34:18+5:302017-11-19T20:35:23+5:30

राज्यातील प्रशासनाचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावरील खिडक्यावरील मोकळ्या जागेत आता लवकरच भक्कम लोखंडी ग्रील बसविले जाणार आहेत.

Iron ore will now be in the ministry window! Sholay style 'movement of movement | मंत्रालयातील खिडक्यांवर लागणार आता लोखंडी ग्रील! ‘शोले स्टाईल’आंदोलनाची परिणती

मंत्रालयातील खिडक्यांवर लागणार आता लोखंडी ग्रील! ‘शोले स्टाईल’आंदोलनाची परिणती

Next

 - जमीर काझी 
मुंबई : राज्यातील प्रशासनाचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावरील खिडक्यावरील मोकळ्या जागेत आता लवकरच भक्कम लोखंडी ग्रील बसविले जाणार आहेत. मंत्रालयात राज्यभरातून येणाºया नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्लूडी) पाठविला आहे.
उस्मानाबाद येथील एका तरुण शेतकºयांने दहा दिवसापूर्वी सातव्या मजल्याच्या सज्जावर चढून ‘शोले स्टाईल’आंदोलन करीत मंंत्री व अधिकाºयांना घाम फोडला होता. त्या पाश्वभूमीवर खिडक्याच्या वरील जागेत ग्रील बसविणे व चौकटी असलेल्या ठिकाणी दरवाजे तातडीने बसविण्याची सूचना करण्यात आली असल्याचे वरिष्ट अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
२६/११’च्या घटना आणि साडेचार वर्षापूर्वी मंत्रालयात लागलेल्या भीषण आगीच्या पाश्वभूमीवर मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आला आहे. मंत्रालयात येणाºया अभ्यगताची तपासणी करण्यासाठी तीनही प्रवेशद्वारावर आधुनिक सामुग्री कार्यरत आहे. तरीही विविध कामानिमित्य मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्री, अधिकाºयांना भेटण्यासाठी आलेल्या काहीजणांनी मंत्रालयात आपली कामे न झाल्याच्या कारणास्तव आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटना गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत. त्यामुळे सत्ताधाºयावर टीका करण्यासाठी विरोधी पक्षाना आयता मुद्दा मिळत असल्याने याबाबी टाळण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाºयांना वेळोवेळी केली आहे.
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) येथील ज्ञानेश्वर साळवे या तरुण शेतकºयाने कर्जमाफी होत नसल्याने १० नोव्हेंबरला मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा देत खळबळ उडवून दिली होती. कृषीमंत्र्यांची भेट होवू न दिल्यास उडी मारण्याची धमकी देत सुमारे दीड तास पोलीस व प्रशासनााची भंबेरी उडविली. त्यावेळी निरीक्षक संतोष ढेमरे यांनी मोठ्या शिताफीने प्रंसगावधान राखीत साळवेने खाली फेकलेल्या चिठ्ठीवरील नंबरवरुन त्याच्याशी संपर्क साधला. सुमारे २० मिनिटे मोबाईलवरुन संभाषण करीत त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. दरम्यानच्या काळात राज्यमंत्री रणजित पाटील, दीपक केसरकर शिक्षणमंत्री विनोद तावडे,व अन्य अधिकारी त्याठिकाणी पोहचत समजूत काढीत त्याला सुखरुपपणे खाली उतरविले. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने वरिष्ठ अधिकाºयांनी पुन्हा एकदा आढावा घेतला. मंत्रालयातील खिडक्याच्या वरील जागेत लोखंडी ग्रील व नुसत्या चौकटी असलेल्या ठिकाणी तातडीने दरवाजे बसविण्याची सूचना ‘पीडब्ल्यूडी’ला विभागाला केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
 
मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिका-याच्या नेतृत्वाखालील सहाय्यक आयुक्त, ९ निरीक्षक,२० उपनिरीक्षकासह सुमारे २०० अंमलदाराचा फौजफाटा कार्यरत आहे. त्यामध्ये ४०वर महिला पोलिसांचा समावेश आहे. मेटल डिटेक्टर,स्कॅनिग मशीनच्या सहाय्याने त्यांच्याकडून अभ्यागताची तपासणी केली जाते.
 
रोज १० हजारावर अभ्यागत
मंत्रालयातील विविध विभागातील अधिकारी,कर्मचाºयांची संख्या सहा हजारावर असून त्याशिवाय रोज ३ ते ४ हजार अभ्यागत विविध कामासाठी येत असतात. त्याशिवाय मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या दिवशी हे प्रमाण ७,८ हजारापर्यत जाते. त्यामध्ये राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे सरासरी १० ते १४ हजार अभ्यागत मंत्रालयात हजेरी लावित असून त्यांच्यावर देखरेख ठेवताना पोलिसांची तारांबळ उडते.

Web Title: Iron ore will now be in the ministry window! Sholay style 'movement of movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.