सिंचनाचे १,४८० लाख पाण्यात
By admin | Published: November 5, 2014 04:26 AM2014-11-05T04:26:20+5:302014-11-05T04:26:20+5:30
तरीही या दोन्ही योजनांत सुधारणा झालेली नाही.
श्याम राऊत, टोकावडे
मुरबाड तालुका पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी तसेच सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभागाने विविध योजना राबविण्यासाठी गेल्या सहा वर्षांत १४८०.४३ लाखांचा खर्च केला. तरीही या दोन्ही योजनांत सुधारणा झालेली नाही.
तालुक्याची पिण्याच्या पाणीवाटपाची समस्या, तसेच दुबार पिके घेण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून नदी नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधण्यात आले. तसेच गावतलाव, पाझर तलाव, जुने बंधारे दुरुस्त करणे यासाठी २००८ ते १४ या सहा वर्षांत १४८०.४३ लाखांचा चुराडा करण्यात आला. मात्र, तरीही पिण्याच्या पिण्याचे वाटप व सिंचन क्षमता वाढल्याचे कुठेही दिसून येत नाही. या बाबत ठेकेदारास विचारले असता त्याने काम परवडत नसल्यामुळेच कामे निकृष्ट असल्याची कबुलीच या ठेकेदाराने दिली. हरिचंद्रगडाच्या पायथ्याशी अतिदुर्गम अशा बांडेशेत या वाडीला १५ लाख खर्च करून बांधलेला सिमेंट बंधारा पावसाळ््यात कोरडा असल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली. व याबाबतचे पुरावे देखील त्यांनी ‘लोकमत’ला दिले. मात्र हे काम पंचायत समिती सदस्य अनिल मेघराज घरत यांचे असल्याने त्यांनी कोणतीही लेखी तक्रार केली नाही.