इर्शाळवाडी भूस्खलन मोठी अपडेट! सिडकोने मदतीसाठी १००० मजूर पाठविले; फडणवीसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 06:07 PM2023-07-20T18:07:31+5:302023-07-20T18:09:29+5:30

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे उत्तर संपल्यानंतर फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. यामध्ये त्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंतची माहिती दिली.

Irshalwadi Landslide Big Update! CIDCO sent 1000 laborers to help; Information from Devendra Fadnavis Monsoon Session | इर्शाळवाडी भूस्खलन मोठी अपडेट! सिडकोने मदतीसाठी १००० मजूर पाठविले; फडणवीसांची माहिती

इर्शाळवाडी भूस्खलन मोठी अपडेट! सिडकोने मदतीसाठी १००० मजूर पाठविले; फडणवीसांची माहिती

googlenewsNext

हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असताना गुरुवारची सकाळ महाराष्ट्रासाठी चिंतेत टाकणारी ठरली. रायगडमध्ये इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावावर दरड कोसळली. यामध्ये ४० हून अधिक घरे गाडली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे उत्तर संपल्यानंतर फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. यामध्ये त्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंतची माहिती दिली. इर्शाळवाडी भूस्खलन मातीचा ढिगारा उपसण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज होती. यामुळे तातडीने सिडकोने १००० मजुरांना तिकडे पाठविले आहे. यासोबत तीन मशीनही तिकडे रवाना करण्यात आल्या आहेत. मजूर आणि एक मशीन घटनास्थळी पोहोचली आहे, असे फडणवीस म्हणाले. 

आताही तिथे मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि ढग आहेत. यामुळे दोन मशीन हेलिकॉप्टरने तिकडे पोहोचविण्यात अडथळे येत आहेत. त्या लवकरात लवकर पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अकुशल कामगार आणि एनडीआरएफचे जवान काम करत आहेत. परंतू, पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आतापर्यंत ९८ जणांना वाचविण्यात आले आहे, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: Irshalwadi Landslide Big Update! CIDCO sent 1000 laborers to help; Information from Devendra Fadnavis Monsoon Session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.