मतदार यादीत माझे नाव आहे की नाही?
By प्रगती पाटील | Published: January 30, 2024 10:26 AM2024-01-30T10:26:52+5:302024-01-30T10:27:24+5:30
Voter List: 65आगामी निवडणुकांसाठी मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यात माझे नाव आहे की नाही ते कसे शोधायचे? नसेल तर काय करता येईल? - प्रतिभा घार्गे, पुणे लोकशाहीमध्ये निवडणूक आणि मतदानाला अनन्यसाधारण महत्व आहे. पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्याची उत्सुकता तरुणांमध्ये असते.
- प्रगती जाधव-पाटील
(वार्ताहर/ उपसंपादक, लोकमत, सातारा)
आगामी निवडणुकांसाठी मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यात माझे नाव आहे की नाही ते कसे शोधायचे? नसेल तर काय करता येईल? - प्रतिभा घार्गे, पुणे
लोकशाहीमध्ये निवडणूक आणि मतदानाला अनन्यसाधारण महत्व आहे. पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्याची उत्सुकता तरुणांमध्ये असते. याबरोबरच बदली होऊन नव्या गावात आलेले मतदार यादीत अपडेटिंग तसेच नाव नोंदणी करतात. आपले नाव यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी आता बूथवर जाण्याची गरज नाही. मतदार यादीत नाव आहे की नाही, हे घरबसल्या तपासता येते. निवडणूक आयोगाच्या http://electoralsearch.in/ वेबसाइटवर नाव दोन प्रकारे शोधता येते. पहिली पद्धत ‘सर्च बाय डिटेल्स’ आणि दुसरी पद्धत म्हणजे ‘सर्च बाय एपिक नंबर.’ सर्च बाय डिटेल्स या पर्यायात स्वत:चे नाव, पत्ता आणि वय यासारखी माहिती भरावी लागते. यानंतर नाव, वडिलांचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ निवडण्याचे पर्याय समोर येतात.
त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर माहिती समोर येते. यामध्ये ओळखपत्र क्रमांकपासून मतदान केंद्रापर्यंत माहिती दिसते. स्वत:चे ओळखपत्र क्रमांक (EPIC No.), राज्य आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करायचा आहे. शोध पर्यायावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती मतदाराच्या समोर येते. यामध्ये ओळखपत्र क्रमांक आणि मतदान केंद्रापर्यंत लिहिलेले दिसेल. हवे असल्यास तुम्ही माहितीची प्रत काढू शकता.
मतदार यादीत नाव नसेल तर रहिवासी व ओळखपत्राचा पुरावा आणि दोन फोटो घेऊन तहसील कार्यालयात अर्ज करावा. तेथे मतदार नोंदणी केली जाते. तेथे यादीतील नाव बघता येईल. नसेल तर तेथे नोंदणी करता येईल. येथे मतदारांचे स्थलांतर तसेच नावातील बदलाचीही नोंद घेतली जाते. ज्या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी लोकल बूथ ऑफिसर किंवा मतदार ॲपवरून स्वतःची नोंदणी केली तरीही आगामी निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकार बजावता येईल.
(सरकारी कार्यालयांशी संबंधित अडचणी / प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता : asezaletar@gmail.com)