इसिस-अल कायदाची घातपाताची योजना
By admin | Published: October 17, 2014 02:27 AM2014-10-17T02:27:40+5:302014-10-17T02:27:40+5:30
आयएसआयएस (इसिस) व अल कायदा या दहशतवादी संघटना देशातील महत्त्वाच्या शहरांत घातपाती कारवाया करू शकतात,
Next
पणजी : आयएसआयएस (इसिस) व अल कायदा या दहशतवादी संघटना देशातील महत्त्वाच्या शहरांत घातपाती कारवाया करू शकतात, असे संकेत राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे (एनएसजी) संचालक जे.एन. चौधरी यांनी दिले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेण्यात आला आहे. गोव्यातील सुरक्षा यंत्रणांनाही सतर्कतेचे आदेश मिळाले आहेत.
श्रीनगरमध्ये तीनवेळा इसिसचे ङोंडे फडकलेले आढळल्याने भारतातही ते दहशतवाद्यांचे जाळे उभारत असल्याचे संकेत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना मिळाले आहेत. त्यांना अल कायदा ही दहशतवादी संघटना मदत करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. देशातील महत्त्वाची शहरे या अतिरेकी संघटनांकडून लक्ष्य होण्याची शक्यता चौधरी यांनी एनएसजीसंबंधीच्या एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. गोव्याच्या सुरक्षा विभागाचे अधीक्षक उमेश गावकर यांनी त्यावर बोलताना, अतिरेकी हल्ल्यांसंबंधी यापूर्वीच अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
नाशिकमध्ये सुरक्षा
नाशिकमध्ये पंचवटीतील काळाराम मंदिराभोवती सुरक्षा वाढविण्यात आली आहे. गोदाघाट, तपोवन, सीतागुंफा परिसरात गस्तीत वाढ करण्यात आली आहे.
धोक्याच्या पाश्र्वभूमीवर स्थितीचा आढावा - र्पीकर
इसिस, अल कायदा या दहशतवादी संघटनांकडून गोव्यासह भारतातील प्रमुख पर्यटनस्थळांना असलेल्या धोक्याच्या पाश्र्वभूमीवर स्थितीचा आढावा घेत असल्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले.