इस्लामची शपथ देत पत्नीला केले गप्प

By Admin | Published: January 25, 2016 02:47 AM2016-01-25T02:47:43+5:302016-01-25T02:47:43+5:30

जिहादसाठी तरुण हेरायचे, त्यांची माथी भडकवायची आणि त्यांना इसिसमध्ये भरती करायचे, हे मुदब्बीर शेखचे काम त्याच्या पत्नीला मान्य नव्हते.

Islam makes oath to Islam | इस्लामची शपथ देत पत्नीला केले गप्प

इस्लामची शपथ देत पत्नीला केले गप्प

googlenewsNext

जितेंद्र कालेकर/
कुमार बडदे, ठाणे/ मुंब्रा
जिहादसाठी तरुण हेरायचे, त्यांची माथी भडकवायची आणि त्यांना इसिसमध्ये भरती करायचे, हे मुदब्बीर शेखचे काम त्याच्या पत्नीला मान्य नव्हते. मात्र तिला कुराणाची आणि इस्लामची शपथ घालून तो तिचा विरोध मोडून काढत असे, असे पोलिसांच्या तपासात आढळले आहे.
मुदब्बीर हा सध्या दिल्लीत असल्याची माहिती एनआयएने त्याच्या कुटुंबीयांना दिल्याने त्याच्या कुटुंबीयांची प्रतीक्षा आता संपली. आता त्याचे सासरे अहमद मियाँ त्याला भेटण्यासाठी सोमवारी दिल्लीला जाणार असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी ‘लोकमत’ला दिली.
एनआयएने फोनवरून तो कुठे आहे, याचा तपशील सांगतानाच कुटुंबीयांना कपडे घेऊन दिल्लीला येण्यास सांगितले. मी आधी एकटाच जाणार असून त्याची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
मूळचा सातारा जिल्ह्याचा असलेल्या मुदब्बीर शेखचा निकाह पदवीधर उज्माशी झाला. लग्नानंतर तो मुंब्रा येथील अमृतनगर भागात राहू लागला. वेबडिझायनिंगचा कोर्स केल्यामुळे ती कामे करतानाच तीन वर्षांपूर्वी त्याचा ‘इसिस’ संघटनेशी संपर्क झाला. तो विचार तरुणांमध्ये पेरण्याच्या कामाला लागला. यात बऱ्यापैकी तो तरबेज झाल्याची खात्री झाल्यावर त्याला थेट भारताचा ‘अमीर’ अर्थात मुख्य कमांडर करण्यात आले. त्यामुळेच तो थेट सीरियातील इसिसच्या म्होरक्यांच्याही संपर्कात होता. त्याला हवालामार्फत पैसे मिळू लागले. सोशल मीडियाचा वापर करून जहाल विचारांच्या तरुणांना हेरून त्यांची माथी भडकवायची, त्यांना फिदाईन (आत्मघाती) हल्ल्यासाठी तयार करायचे, इसिसमध्ये त्यांना भरती करायचे, त्यासाठी सर्व व्यवस्था करायची, अशी कामगिरी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. ती तो घरूनच करायचा, हेही कॉम्प्युटरवरील डाटातून स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. संगणकावर त्याचे सतत चालणारे काम, त्यावर अतिरेकी संघटनांची चित्रे आणि कृत्ये पाहूनच तिच्या मनात शंका निर्माण झाली होती. पण त्याने कुराणातील शिकवणीनुसार मी हे करत असल्याचे सांगून तिची समजूत काढली होती.
च्इंटरनेटवरूनच इसिसच्या संपर्कात राहून धर्मांधतेला खतपाणी घालणे, जिहादसाठी तरुणांची माथी भडकवणे, इसिसच्या कामाची माहिती देऊन भारताविरुद्ध कारवायांसाठी तरुणांना तयार करणे, त्यांना इसिससारख्या
जहाल संघटनेत सहभागी होण्यास उद्युक्त करणे, हेच काम तो सोशल मीडियातून अहोरात्र करत होता.
च्अशा तरुणांमध्ये जिहादी विचारसरणी पेरण्यासाठी नेटद्वारेच विखारी साहित्य, मजकूर, छायाचित्रे आणि व्हिडीओ क्लिपिंग पाठविण्याचेही काम तो करायचा. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर त्याचे हे काम सुरू होते. शिवाय, इसिसमध्ये भरतीसाठी तयार झालेल्यांना पैसे देणे, त्यात गोपनीयता ठेवणे आणि त्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी करणे, ही कामेही त्याच्याकडे सोपविण्यात आली होती.
मुंबईतील चौघांना बडोद्यात घेतले ताब्यात
च्गुजरातमध्ये बडोदा येथे पोलिसांनी सहा संशयितांना स्थानबद्ध केले. हे सहाही जण मुंबईत राहणारे आहेत. स्थानिकांनी त्यांच्या संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना सूचना दिली होती. बडोदा येथील याकुटपुरा या संवेदनशील भागातील एका दर्ग्यातून सकाळी ७.३० वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले.
च्हे सहाही जण रविवारी सकाळी रेल्वेने मुंबईहून बडोद्यात आले होते. पोलिसांना त्यांच्याकडे काहीही आक्षेपार्ह किंवा संशयास्पद आढळले नाही. त्यातील मोहम्मद सलीम हा पत्रकार आहे. त्याने पोलिसांना ओळखपत्रही दाखविले. आपण दर्ग्यात नमाज अदा करण्यासाठी आल्याचा दावा सहा जणांनी केला.

 

Web Title: Islam makes oath to Islam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.