इसा मेमनचा अर्जित रजेचा अर्ज फेटाळला
By admin | Published: September 17, 2015 01:35 AM2015-09-17T01:35:03+5:302015-09-17T01:35:03+5:30
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा झालेला दहशतवादी याकूब मेमनचा भाऊ इसा मेमन याचा ‘डेथ पॅरोल’ (अर्जित रजा)चा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे
- १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण
औरंगाबाद : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा झालेला दहशतवादी याकूब मेमनचा भाऊ इसा मेमन याचा ‘डेथ पॅरोल’ (अर्जित रजा)चा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. बी. चौधरी आणि न्या. इंदिरा जैन यांनी फेटाळला. याकूबच्या चाळीसाव्या दिवसाच्या विधीसाठी उपस्थित राहण्याकरिता रजा मिळावी, अशी विनंती इसाने केली होती.
इसा हर्सूल कारागृहात बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. ३० जुलै रोजी याकूबला नागपूरच्या कारागृहात फाशी देण्यात आली. इसाने याकूबच्या चाळीसाव्याच्या विधीसाठी उपस्थित राहण्याकरिता अर्जित रजा मिळण्याकरिता विभागीय आयुक्तांकडे डेथ पॅरोल मिळावा म्हणून अर्ज केला होता. २६ आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्तांनी त्याचा अर्ज फेटाळला होता.
म्हणून इसाने विभागीय आयुक्तांच्या आदेशास औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.
तेथे अर्ज फेटाळताना याचिकाकर्त्याला एकूणच परिस्थितीत पॅरोलवर सोडता येणार नाही, याची न्यायालयाला जाण आहे. त्यामुळे कायद्याचा वचक राहणार नाही, असे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने इसा मेमनचा पॅरोल अर्ज फेटाळला.