जेरुसलेमचा मुद्दा पेटण्याची चिन्हे; अमेरिका, इस्त्रायली वस्तूंवर मुस्लीम समाजाचा बहिष्कार; आज मुंबईत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 03:43 IST2017-12-21T03:42:48+5:302017-12-21T03:43:32+5:30
इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमची घोषणा करणाºया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात मुंबईतील मुस्लीम समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधित निर्णय अमेरिकेने तत्काळ रद्द करावा, म्हणून अमेरिका, इस्रायली वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन रजा अकादमीने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. या आवाहनाला अधिकाधिक मुस्लीम आणि इतर धर्मीय संघटनांनी पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी, २१ डिसेंबरला मुंबईतील इस्लामिक जिमखान्यामध्ये रजा अकादमीने महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.

जेरुसलेमचा मुद्दा पेटण्याची चिन्हे; अमेरिका, इस्त्रायली वस्तूंवर मुस्लीम समाजाचा बहिष्कार; आज मुंबईत बैठक
मुंबई : इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमची घोषणा करणा-या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात मुंबईतील मुस्लीम समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधित निर्णय अमेरिकेने तत्काळ रद्द करावा, म्हणून अमेरिका, इस्रायली वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन रजा अकादमीने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. या आवाहनाला अधिकाधिक मुस्लीम आणि इतर धर्मीय संघटनांनी पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी, २१ डिसेंबरला मुंबईतील इस्लामिक जिमखान्यामध्ये रजा अकादमीने महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.
रजा अकादमीचे सरचिटणीस मोहम्मद सईद नूरी यांनी सांगितले की, राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात हे आंदोलन होईल. शांततापूर्ण मार्गाने आपल्या भावना दुखावल्याचे लक्षात आणून देण्यासाठी बहिष्काराचे अस्त्र मुस्लीम समाजाने स्वीकारले आहे. अमेरिकेतून देशात आयात होणाºया सर्वच प्रकारच्या वस्तूंवर मुस्लीम समाज बहिष्कार घालून रोष व्यक्त करणार आहे. याआधीही चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे समाजाने बहिष्कारातून अमेरिकेला वठणीवर आणले होते. त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
...म्हणून आंदोलन-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमची घोषणा केली आहे. मात्र पॅलेस्टाईनचे पंतप्रधान डॉ. रामी हमदल्ला यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतलेली आहे. शिवाय युनोमध्येही १४ विरोधात १ असा ठराव करत ट्रम्प यांचा निर्णय रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारण्यात येणार आहे.