आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राम मंदिराचा मुद्दा हाती : उध्दव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 03:32 PM2018-11-22T15:32:26+5:302018-11-22T15:51:48+5:30

ताकाला जाऊन भांडे लपविण्याची आम्हांला सवय नाही..

issue of Ram temple in front of the upcoming elections : Uddhav Thackeray | आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राम मंदिराचा मुद्दा हाती : उध्दव ठाकरे 

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राम मंदिराचा मुद्दा हाती : उध्दव ठाकरे 

Next
ठळक मुद्देकिल्ले शिवनेरीवर मंगल कल़श पुजन शिवनेरीवरील पवित्र पाणी व मातीचा मंगल कलश सोबत घेवून उद्धव ठाकरे अयोध्येला कुच करणार

जुन्नर : अटलबिहारी वाजपेयी यांचे मिलीजुली सरकार होते. आता केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आहे. मग राममंदिर उभारणीस विलंब का.? निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राममंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे. ताकाला जाऊन भांडे लपविण्याची आम्हांला सवय नाही. मला काही जणांची भांडेफोड करायची आहे, अशी अप्रत्यक्षरित्या भाजपा सरकारवर टिपणी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवनेरी किल्ल्यावर केली. शिवसेनेच्या वतीने अयोध्यकडे प्रस्थान करण्यापूर्वी त्यांनी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ठाकरे यांनी राममंदिराविषयीची भूमिका स्पष्ट केली. 


शिवसेनेच्या वतीने अयोध्या येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी चैतन्यस्थळ स्फूर्ती शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरून मंगल कल़श नेण्यात आला. शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे दि.२५ रोजी अयोध्या येथे रामजन्मभूमीत दर्शनासाठी जात आहेत. तत्पूर्वी त्यांनी पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले शिवनेरीवरील पवित्र माती व जल यांच्या मंगल कलशाचे पुजन करण्यात आले. शिवनेरी वरील पवित्र पाणी व मातीचा मंगल कलश सोबत घेवून उद्धव ठाकरे अयोध्येला कुच करणार आहे. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके,पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण ,नगराध्यक्ष शाम पांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी,तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, अरुण गिरे,युवासेना जिल्हाध्यक्ष गणेश कवडे,नगरसेवक दीपेश परदेशी, यांसह शिवसेनेचे विविध पदाधिकारी,शिवसैनिक मोठ्या संख्येने गडावर उपस्थित होते.   
उध्दव ठाकरे म्हणाले, राम मंदिर आणि हिंदुत्व याविषयावर कोणतेही गट तट असू नयेत. आमचं हृदय,मन भगवे आहे. किल्ले शिवनेरीची माती पवित्र माती आहे. या मातीमध्ये चमत्कार करणारी ताकद आहे. किल्ले शिवनेरी हिंदुस्थानातील पवित्रस्थान आहे. शिवनेरीवरील माती हिंदू धर्मियांच्या भावना म्हणुन अयोध्येस नेत आहे. .महाराष्ट नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती चर्चेची ठरली. किल्ले शिवनेरीवर रुद्राक्षाची पाच झाडे शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्या हस्ते लावण्यात आली

Web Title: issue of Ram temple in front of the upcoming elections : Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.