फडणवीसांनी निधी केंद्राकडे परत पाठवल्याचे आयटीसेलचे मॅसेज भाजपवरच उलटले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 02:15 PM2019-12-03T14:15:58+5:302019-12-03T14:16:15+5:30

खासदाराच्या दाव्यानंतर खुद्द फडणवीसांना समोर यावे लागले. आपण निधी परत पाठविण्याचे काम केले असून या दाव्यांमध्ये तथ्य नाही, असं त्यांनी सांगितले.  एकूणच फडणवीसांच्या 80 तासांच्या कार्यकाळाचे समर्थन करणारे आयटीसेल आणि हेगडे यांचे दावे भाजपवरच उलटल्याची चित्र आहे.

IT Cells message reversed on BJP over Fadnavis sending funds back to central government | फडणवीसांनी निधी केंद्राकडे परत पाठवल्याचे आयटीसेलचे मॅसेज भाजपवरच उलटले

फडणवीसांनी निधी केंद्राकडे परत पाठवल्याचे आयटीसेलचे मॅसेज भाजपवरच उलटले

Next

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. दुसऱ्या कार्यकाळात फडणवीस केवळ 80 तास मुख्यमंत्रीपदी राहू शकले. राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या आयटी सेलकडून फडणवीसांच्या शपथविधीचं एक भलामोठा मॅसेज व्हायरल करून समर्थन करण्यात आले. मात्र आयटीसेलचा हा प्रचारा भाजपवरच उलटल्याचे चित्र आहे. 

फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच भाजपची आयटी सेल कामाला लागली होती. आयटी सेलच्या माध्यमातून फडणवीसांच्या 80 तासांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचे कौतुक करण्यात आले. राज्यातील मोठमोठ्या प्रकाल्पांच्या 40 हजार कोटी रुपयांच्या निधीचा महाविकास आघाडीचे सरकार गैरवापर करू नये यासाठी फडणवीसांनी तातडीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तसेच या 80 तासांच्या काळात फडणवीसांनी निधी केंद्राकडे परत पाठवला. 

फडणवीसांनी राज्याच्या भल्यासाठी हा निर्णय़ घेतला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन असंही म्हटले होते. हे मॅसेज सोशल मीडियावर फिरत असताना भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी देखील फडणवीसांनी निधी परत पाठवल्याचा दावा केला. त्यानंतर विरोधकांकडून फडणवीसांवर टीका करण्यात आली. राज्यातील जनतेशी ही दगाबाजी असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान खासदाराच्या दाव्यानंतर खुद्द फडणवीसांना समोर यावे लागले. आपण निधी परत पाठविण्याचे काम केले असून या दाव्यांमध्ये तथ्य नाही, असं त्यांनी सांगितले.  एकूणच फडणवीसांच्या 80 तासांच्या कार्यकाळाचे समर्थन करणारे आयटीसेल आणि हेगडे यांचे दावे भाजपवरच उलटल्याची चित्र आहे.
 

Web Title: IT Cells message reversed on BJP over Fadnavis sending funds back to central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.