गुलाबराव पोळ यांनी ‘प्लॅँचेट’ केल्याचे उघड

By admin | Published: July 23, 2014 04:14 AM2014-07-23T04:14:09+5:302014-07-23T04:14:09+5:30

माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी फेटाळून 24 तास उलटण्याच्या आतच पत्रकार आशिष खेतान यांनी चित्रफितच प्रसिद्ध केली.

It is clear that Gulabrao Pol has done 'Plantech' | गुलाबराव पोळ यांनी ‘प्लॅँचेट’ केल्याचे उघड

गुलाबराव पोळ यांनी ‘प्लॅँचेट’ केल्याचे उघड

Next
पुणो : अंधश्रद्धा निमरूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणाचा तपास करताना प्लँचेट (जादूटोणा) केल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी फेटाळून 24 तास उलटण्याच्या आतच पत्रकार आशिष खेतान यांनी चित्रफितच प्रसिद्ध केली. या कथित चित्रफितीत पोळ यांनी प्लॅँचेट केल्याची कबुलीही दिल्याचे दिसून येते.
डॉ. दाभोलकर यांच्या मारेक:यांचा शोध घेण्यास पोळ यांनी प्लॅँचेट केल्याचा आरोप नियतकालिकात केला गेला होता. याबाबत पोळ यांनी पत्र परिषद बोलावून पत्रकार खेतान आणि संबंधित नियतकालिकाविरुद्ध 1क्क् कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे सोमवारी जाहीर केले होते. या पाश्र्वभूमीवर खेतान यांनी एक व्हिडीओ टेप उघड केल्याने या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे. हत्ये प्रकरणी जंगजंग पछाडूनही आरोपींचा शोध लागत नसल्याने निराश झालेल्या पुणो पोलिसांनी तंत्रमंत्रचा अवलंब करून छडा लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. पुणो पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी देवऋषी मनीष ठाकूर याने दाभोलकरांच्या आत्म्याला बोलावण्यास प्लँचेटचे प्रात्याक्षिक करून दाखविल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसते, असा खेतान यांचा दावा आहे. याबाबत गुलाबराव पोळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्या घरातील लोकांनी मोबाईल घरी ठेवून ते बाहेर गेल्याचे सांगितल़े त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़
पोळ यांनी प्लँचेट केल्याचे खेतान यांच्या ‘स्टिंग’मध्ये दिसून येते. त्यामुळे प्लँचेट करणा:या ठाकूर विरोधात जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंनिसचे राज्य सचिव मिलिंद देशमुख यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
 
ठोस पुरावा नाही, हे बदनामीचे षड्यंत्र
च्हे स्टिंग ऑपरेशन असत्य असून गुलाबराव पोळ यांना बदनाम करण्यास रचलेले हे षडयंत्र आहे. त्यांनी प्लँचेट केल्याचा हा ठोस पुरावा ठरू शकत नाही. हे प्लँचेट आयुक्तांच्या अँटिचेंबरमध्ये झाल्याचे कुठेही दिसत नाही. तसेच पोळ यांच्या बोलण्यातही त्यांनी डॉ. दाभोलकर यांच्याशी संवाद साधल्याचे स्पष्ट होत नाही, असे पोळ यांचे वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी म्हटले आहे.
 
पोलीस दलात किती अंधo्रद्धा आहे, याचा प्रत्यय यातून येतो. त्यांच्यातील अंधo्रद्धा दूर व्हाव्यात याकरिता कृतीकार्यक्रम राबविण्याची गरज आहे. - हमीद दाभोलकर 
 
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 2क् ऑगस्ट 2क्13 रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

 

Web Title: It is clear that Gulabrao Pol has done 'Plantech'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.