कोेकणातील पंतप्रधान केला तरी फरक पडत नाही, उदय सामंत यांची भाजप-राणेंवर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 06:42 PM2021-07-13T18:42:30+5:302021-07-13T18:45:42+5:30

Politics Konkan Udaysamant : राज्यात चार नव्हे तर ४० केंद्रीय मंत्री केले आणि कोकणातील पंतप्रधान केला तरी शिवसेनेला काहीही फरक पडत नाही, अशी टिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नूतन सूक्ष्म, लघू, मध्यम मंत्री नारायण राणे आणि भाजपवर नामोल्लेख टाळून मंगळवारी केली. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला एक नंरबचा पक्ष बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

It doesn't matter if he is the Prime Minister of Konkan, Uday Samant's criticism of BJP, Rane | कोेकणातील पंतप्रधान केला तरी फरक पडत नाही, उदय सामंत यांची भाजप-राणेंवर टिका

कोेकणातील पंतप्रधान केला तरी फरक पडत नाही, उदय सामंत यांची भाजप-राणेंवर टिका

Next
ठळक मुद्देकोेकणातील पंतप्रधान केला तरी फरक पडत नाही : उदय सामंत भाजप, राणेंवर टिका, शिवसंपर्क अभियानचे उदघाटन

कोल्हापूर : राज्यात चार नव्हे तर ४० केंद्रीय मंत्री केले आणि कोकणातील पंतप्रधान केला तरी शिवसेनेला काहीही फरक पडत नाही, अशी टिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नूतन सूक्ष्म, लघू, मध्यम मंत्री नारायण राणे आणि भाजपवर नामोल्लेख टाळून मंगळवारी केली. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला एक नंरबचा पक्ष बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शहरात शिवसंपर्क अभियानच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. शासकीय विश्रामगृहात कार्यक्रम झाला. जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थित होती.

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

स्वत:च्या ग्रामपंचायतमध्ये सत्ता नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी टिका मंत्री सामंत यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केली. विधानसभेवेळी माझ्या पाठीत काही जणांनी खंजीर खुपसल्याने पराभव झाला. मंत्री पदाची संधी चालून आली होती, त्यावेळी एका नेत्याने विरोध केला, अशी टीका माजी आमदार क्षीरसागर यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता केली.

Web Title: It doesn't matter if he is the Prime Minister of Konkan, Uday Samant's criticism of BJP, Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.