सर्वांची माफी मागून आयटी अभियंत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 11:10 PM2017-07-24T23:10:32+5:302017-07-24T23:10:32+5:30
वाकड मधील आयटी अभियंत्याने सुसाईड नोट मध्ये सर्वांची माफी मागून राहत्या घरात दोरिच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना
Next
>ऑनलाइन लोकमत
वाकड, दि. 24 - वाकड मधील आयटी अभियंत्याने सुसाईड नोटमध्ये सर्वांची माफी मागून राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि २४) रात्री साडे आठच्या सुमारास उघडकीस आली.
किरण राजू भुजबळ (वय २५, रा. भुजबळ वस्ती वाकड) असे त्याचे नाव असून तो पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला होता. रिक्षा व्यावसायिक व शेतकरी राजू भुजबळ यांचा तो एकूलता एक मुलगा गेल्या दोन-तीन महिन्यापुर्वीच त्याचे लग्न झाले होते.
याबाबत फौजदार शरद जाधव यांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी सायंकाळी घरी किरण एकटाच होता रात्री साडे आठच्या सुमारास त्याचे मेहुणे घरी आले होते तेव्हा घराचे सर्व दरवाजे आतून बंद दिसले त्यांनी बराच वेळ आवाज देवूनही आतुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी राजू भुजबळ यांना फोन केला असता त्यांनी किरण घरीच असल्याचे सांगितले. तेव्हा शेजा-यांची मदत घेवून त्यांनी घरात प्रवेश केला असता किरणने गळफास घेतल्याचे उघड झाले.
किरणने आत्महत्येपूर्वी मला जगावस वाटत नाही, आई-वडिलांनी मला खूप शिकविले मात्र मी त्यांचे उपकार फेडू शकलो नाही, असे म्हणत आई-वडील, पत्नी यांच्यासह सर्वांची माफी मागितली आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. किरणच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.