...हे तर इस्लाम धर्मात महापाप!

By admin | Published: October 20, 2015 04:30 AM2015-10-20T04:30:10+5:302015-10-20T04:30:10+5:30

संत पुरुषांच्या कबरीजवळ महिलांनी जाणे, हे इस्लाम धर्मात महापाप समजले जाते, त्यामुळे त्यांना अशा ठिकाणी प्रवेशासाठी निर्बंध घालण्यात आले असल्याची माहिती सोमवारी

... It is a great religion in Islam! | ...हे तर इस्लाम धर्मात महापाप!

...हे तर इस्लाम धर्मात महापाप!

Next

हाजीअली ट्रस्टची भूमिका : म्हणे, संत पुरुषाच्या कबरीजवळ महिला नकोच

मुंबई : संत पुरुषांच्या कबरीजवळ महिलांनी जाणे, हे इस्लाम धर्मात महापाप समजले जाते, त्यामुळे त्यांना अशा ठिकाणी प्रवेशासाठी निर्बंध घालण्यात आले असल्याची माहिती सोमवारी हाजीअली ट्रस्टच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली. हाजीअली दर्ग्याच्या गाभाऱ्यात महिलांना बंदी घालण्याच्या ट्रस्टच्या निर्णयाविरुद्ध दाखल याचिकेची सुनावणी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठासमोर सुरु आहे. बंदीविरोधात डॉ. नूरजहाँ नियाज आणि भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाच्या झाकीया सोमण यांनी त्याबाबत मार्च २०१२ मध्ये याचिका दाखल केलेली आहे.
ट्रस्टने मंजूर केलेला ठराव ट्रस्टची बाजू मांडणारे अ‍ॅड. शोएब मेमन यांनी सोमवारी खंडपीठापुढे सादर केला. दर्ग्यामध्ये उपासना करणे, हे इस्लाम धर्मामध्ये अत्यंत महत्वाचे आहे की नाही? याचे उत्तर ट्रस्टला द्यायचे होते, असे याचिकाकर्त्यांचे वकील राजू मोरे यांनी खंडपीठाला सांगितले. ‘आम्हाला आशा आहे की, यावर काहीतरी तोडगा निघेल,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला ठेवली. यावेळी खंडपीठ या याचिकेवरील अंतिम सुनावणीची तारीख निश्चित करेल. (प्रतिनिधी)

महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना पुरुषांपासून स्वतंत्र ठिकाणी प्रार्थनेसाठी जागा निश्चित करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

आमच्या कारभारात ढवळाढवळ नाही
ट्रस्टची स्थापना राज्यघटनेच्या अधीन राहून करण्यात आली आहे. ट्रस्टला स्वत:चा कारभार कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय चालवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ट्रस्टच्या कारभारात कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही, असे ठरावात म्हटले आहे.
महिलांचे हित लक्षात घेऊनच हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यांना कबरीच्या जवळच नमाज पठण्यासाठी स्वतंत्र जागा देण्यात आल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. ‘महिलांना कबरीजवळ कधीच न जाऊ देण्यावर सर्व विश्वस्तांचे एकमत आहे. महिलांसाठी सुरू करण्यात आलेले प्रवेशद्वार कबरीपासून जवळच आहे,’ असेही अ‍ॅड. मेमन यांनी खंडपीठाला सांगितले.

Web Title: ... It is a great religion in Islam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.