‘मद्यनिर्मिती उद्योगांना पाणी देण्यात गैर काय?’
By admin | Published: April 17, 2016 03:06 AM2016-04-17T03:06:52+5:302016-04-17T03:06:52+5:30
मराठवाड्यातील दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे
बीड : मराठवाड्यातील दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र या उद्योगांना पाणीपुरवठा करण्यात गैर काय, असा सवाल केला आहे. दुष्काळी आढावा बैठकीनंतर त्यांनी उद्योगधंद्यांसाठीचे आरक्षित पाणी त्यांना देण्यात चुकीचे काहीही नाही, अशी भूमिका मांडली.
मराठवाड्यात सहा मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. यांचा पाणीपुरवठा बंद केला तर उद्योगांपेक्षा येथील कामगारांचे आणि सरकारचे अधिक नुकसान होईल. या उद्योगांमुळेच सरकारला महसूल आणि नागरिकांना रोजगार मिळतो. मद्यनिर्मिती करणारी कंपनी असली तरी त्यातून अनेकांचे पोट भरते. या कंपन्या बंद झाल्या तर अनेकांवर उपासमारीची वेळ येईल, अशी पुस्तीही त्यांनी या वेळी जोडली.