तातडीने शंभर टक्के ‘कॅशलेस’ होणे अशक्यच

By admin | Published: January 1, 2017 03:10 AM2017-01-01T03:10:27+5:302017-01-01T03:10:27+5:30

पालघर जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या २८८ शाखा असून प्रत्येक शाखेला एक-एक गाव कॅशलेस करण्याचे कालबद्ध उद्दिष्ट देण्यात आले आहे. अर्बन बँकांनाही शाखेजवळील

It is impossible for one hundred percent to become cashless | तातडीने शंभर टक्के ‘कॅशलेस’ होणे अशक्यच

तातडीने शंभर टक्के ‘कॅशलेस’ होणे अशक्यच

Next

पालघर जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या २८८ शाखा असून प्रत्येक शाखेला एक-एक गाव कॅशलेस करण्याचे कालबद्ध उद्दिष्ट देण्यात आले आहे. अर्बन बँकांनाही शाखेजवळील हॉटेल, भाजीविक्रेते, दुकानदार आदींना भेटून त्यांची खाती बँकांत उघडून अधिकाधिक व्यवहार कॅशलेस करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. चिकूसाठी प्रसिद्ध असलेल्या घोलवड या गावातील ‘कॅशलेस’चे चित्र मात्र फारसे आशादायक नाही. गावात एकच बँक शाखा, एकच एटीएम आहे. तसेच स्मार्ट फोन आणि इंटरनेट वापरकर्त्यांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे हे गाव पूर्णत: कॅशलेस करण्याचे उद्दिष्ट तातडीने साध्य होण्याची शक्यता दिसत नाही.

गाव : घोलवड
पालघर जिल्ह्यापासूनचे अंतर :
रेल्वेने - ४५ किमी/ रस्त्याने-५५
मुंबईपासून : रेल्वेने १३१ किमी
/ रस्त्याने १६५
गावात पोस्ट आॅफिस ? : आहे
एटीएम : एक
बँक संख्या : एक (बँक आॅफ बडोदा)
वाहतूक सुविधा
(एसटी) : होय
गावात
इंटरनेट : आहे
नेट कनेक्टिव्हिटी : असमाधानकारक
वीजपुरवठा :
आहे (तूर्तास लोडशेडिंग नाही)
गावात डिजिटल/
कॅशलेस
व्यवहार : होय
या दोन
महिन्यांत कॅशलेस व्यवहार वाढलेत का : होय
कसे ? : औषध, पेट्रोल,
वीज, टेलिफोन इ. बिलांचा आॅनलाइन
भरणा करून

40%
स्मार्टफोनधारक

60%
साक्षरता

20%
कॅशलेस व्यवहार

गाव डिजिटल झाल्यास उद्योग-धंद्याचे चित्र पालटेल. रोकडविरहित व्यवहार सर्वांसाठी फायदेशीर ठरतील. मात्र त्यासाठी इंटरनेट अखंडित व वेगवान असणे आवश्यक आहे.
- अजय शाह, व्यापारी

कॅशलेसचा निर्णय स्वागतार्ह आहे. याकरिता ग्रामीण भागात सामान्य नागरिकांना साक्षर तसेच प्रशिक्षित केले पाहिजे.
- हरकचंद राजावत, उपसरपंच

कृषी क्षेत्रासाठी स्वागतार्ह निर्णय आहे. शेतमालाची खरेदी-विक्र ी कॅशलेस झाल्यास फायदेशीर आहे. मात्र मजुरांना पैसे रोखीने द्यावे लागतात. त्याला पर्याय शोधला पाहिजे.
- गणेश राऊत, बागायतदार

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार शेतकरी सोसायट्यांच्या सदस्यांना डेबिट तसेच क्रे डिट कार्ड वापरणे बंधनकारक केले जाणार आहे. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकांना कळविण्यात आले आहे. सर्व सदस्य शेतकऱ्यांचे अर्ज भरणे सुरू केले आहे.
- जयप्रकाश बारी, अध्यक्ष, घोलवड सेवा सोसायटी

Web Title: It is impossible for one hundred percent to become cashless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.