भाजपमुळेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये, राज्यातील तरुणांना बेरोजगार केले, रोहित पवारांचा घणाघात

By नामदेव मोरे | Published: September 19, 2022 02:08 PM2022-09-19T14:08:41+5:302022-09-19T14:09:34+5:30

Rohit Pawar: भाजपामुळेच महाराष्ट्रातील वेदांतासह अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. प्रकल्प पळविल्यामुळे राज्यातील तरूणांवर बेरोजगारीचे संकट आले असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे

It is because of BJP that the industries in Maharashtra have become unemployed in Gujarat, the youth of the state, Rohit Pawar's attack | भाजपमुळेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये, राज्यातील तरुणांना बेरोजगार केले, रोहित पवारांचा घणाघात

भाजपमुळेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये, राज्यातील तरुणांना बेरोजगार केले, रोहित पवारांचा घणाघात

googlenewsNext

- नामदेव मोरे 
नवी मुंबई - भाजपामुळेच महाराष्ट्रातील वेदांतासह अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. प्रकल्प पळविल्यामुळे राज्यातील तरूणांवर बेरोजगारीचे संकट आले असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाटयगृहात राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने ओबीसी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात रोहित पवार यांनी भाजपावर टिका केली. फक्त वेदांताच नाही तर इतर अनेक उद्योग गुजरात ला पळविले.  महाराष्ट्रातील तरूणांचा रोजगार हिरावून घेतला आहे.  अनेक महत्वाची कार्यालये स्थलांतर केली  आहेत.  बुलेट ट्रेन गुजरात च्या भल्यासाठी आणली जात आहे. त्यांच्यासाठी आपण कर्जबाजारी का व्हायचे असा प्रश्न ही पवार यांनी उपस्थित केला. यावेळी छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, नामदेव भगत उपस्थित होते.

ओबीसी आरक्षणालाही भाजपचा विरोध होता. राज्यात ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ने नेहमी पाठपुरावा केला. भाजपने नेहमी ओबीसी आरक्षणाला विरोधच केला असा आरोप ही रोहित पवार यांनी केला.

Web Title: It is because of BJP that the industries in Maharashtra have become unemployed in Gujarat, the youth of the state, Rohit Pawar's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.