Maharashtra Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीसोबत राहणं कठीण, भाजपासोबत चला, नाहीतर...; 'वर्षा'वर गेलेल्या आमदारांचाच उद्धव ठाकरेंना 'अल्टिमेटम'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 03:01 PM2022-06-21T15:01:12+5:302022-06-21T15:10:38+5:30

It is difficult to live with NCP go with BJP otherwise shivsena mla Ultimatum to Uddhav Thackeray राज्याच्या राजकारणात शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. कट्टर शिवसैनिक आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून त्यांच्यासोबत ३० ते ३५ आमदार असल्याची माहिती आहे.

It is difficult to live with NCP go with BJP otherwise shivsena mla Ultimatum to Uddhav Thackeray | Maharashtra Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीसोबत राहणं कठीण, भाजपासोबत चला, नाहीतर...; 'वर्षा'वर गेलेल्या आमदारांचाच उद्धव ठाकरेंना 'अल्टिमेटम'

Maharashtra Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीसोबत राहणं कठीण, भाजपासोबत चला, नाहीतर...; 'वर्षा'वर गेलेल्या आमदारांचाच उद्धव ठाकरेंना 'अल्टिमेटम'

googlenewsNext

मुंबई-

Maharashtra Vidhan Parishad Election 2022 राज्याच्या राजकारणात शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. कट्टर शिवसैनिक आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून त्यांच्यासोबत ३० ते ३५ आमदार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या धक्क्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आज दुपारी १२ वाजता सर्व आमदार आणि नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या बैठकीला शिवसेनेच्या ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित होते. त्यातही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्याच भूमिकेशी सहमती दर्शविल्याची माहिती समोर आली आहे. 

सरकार कोसळलं तर भाजपासोबत जाणार का? थेट नकार न देता शरद पवार हसले अन् म्हणाले...

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा'वर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. यात मंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड तसेच संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांची 'मन की बात' बोलून दाखवली. भाजपासोबत चला नाहीतर वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा थेट 'अल्टिमेटम' वर्षावर उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंना दिला असल्याचं सांगितलं जात आहे.

"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर?", शरद पवारांनी सांगितली राष्ट्रवादीची भूमिका

राष्ट्रवादीसोबत राहणं कठीण असून आमच्या मतदार संघांमध्ये आमची गळचेपी केली जात आहे. त्यांच्यासोबत निवडणूक लढणं वगैरे अशक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला खाऊन टाकेल, अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसोबत मांडली आहे. मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भावना समजून घेण्याचंही आवाहन यावेळी उपस्थित आमदारांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं बोललं जात आहे. 

आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, भगव्याचे रक्षक; उद्धव ठाकरे आमदारांना काय म्हणाले?

गेली अडीच वर्ष सत्तेचा वापर राष्ट्रवादीनेच केला आहे. राष्ट्रवादीबद्दल शिवसेनेत प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे यापुढेही त्यांच्यासोबत राहिलो, तर फक्त खच्चीकरणाचा प्रयत्न होत राहील, असंही आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपलं गाऱ्हाणं माडलं आहे. 

Web Title: It is difficult to live with NCP go with BJP otherwise shivsena mla Ultimatum to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.