स्पर्धा परीक्षा पारदर्शक होत नाही, हे सरकारचे अपयश; सुप्रिया सुळेंचा निशाणा

By अण्णा नवथर | Published: July 19, 2024 10:08 AM2024-07-19T10:08:05+5:302024-07-19T10:08:30+5:30

सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तीन आठवड्यामध्ये अहवाल सादर करावा अशी मागणी त्यांनी केली.

It is the government's failure that the competitive examination is not transparent; - Supriya Sule | स्पर्धा परीक्षा पारदर्शक होत नाही, हे सरकारचे अपयश; सुप्रिया सुळेंचा निशाणा

स्पर्धा परीक्षा पारदर्शक होत नाही, हे सरकारचे अपयश; सुप्रिया सुळेंचा निशाणा

अहमदनगर: नोकर भरती पारदर्शक झाल्या पाहिजेत .परंतु भाजप सरकार आल्यापासून भरत्या पारदर्शक होत नाहीत, आता  स्पर्धा परीक्षेमधील घोटाळे समोर येत असून,  हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे नगरमध्ये केली.

खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी नगर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी खासदार निलेश लंके व पदाधिकारी उपस्थित होते. त्या म्हणाल्या, की देशात महागाई ,भ्रष्टाचार, दुष्काळ अशा अनेक समस्या आहेत अशा परिस्थितीमध्ये पूजा खेडकर हे प्रकरण समोर आले. रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याबाबत सरकारला विनंती केलेली आहे. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तीन आठवड्यामध्ये अहवाल सादर करावा. तलाठी व इतर अनेक भरत्या होतात. पण या त्या पारदर्शक होत नाहीत. आता स्पर्धा परीक्षा ही पारदर्शक होत नसल्याचे समोर आलेआहे. हे प्रकार भाजपचे सरकार आल्यापासूनच घडत आहेत. 

सरकारने वाघनखे आणले आहेत. परंतु ते खरे आहेत की नाही हे सरकारने सांगितलं पाहिजे, असेही सुळे म्हणाल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागील पाच वर्षांमध्ये  गृह खाते होते. त्यावेळी नागपूर क्राइम कॅपिटल होते. आता पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे गुन्हेगारीमुळे चर्चेत आलेले आहे. हे पूर्णपणे सरकारचे आपयश आहे, अशी ती काही सुळे यांनी केली.

Web Title: It is the government's failure that the competitive examination is not transparent; - Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.