तुम्ही कोणालाही मंत्री म्हणून शपथ देणे घटनाबाह्य, शिवसेनेचे राज्यपाल कोश्यारी यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 06:29 AM2022-07-13T06:29:24+5:302022-07-13T06:31:42+5:30

संजय राऊत यांनी दिली यासंदर्भातील माहिती.

It is unconstitutional for you to swear in anyone as a minister a letter to Shiv Sena Governor bhagat singh Koshyari maharashtra political crisis | तुम्ही कोणालाही मंत्री म्हणून शपथ देणे घटनाबाह्य, शिवसेनेचे राज्यपाल कोश्यारी यांना पत्र

तुम्ही कोणालाही मंत्री म्हणून शपथ देणे घटनाबाह्य, शिवसेनेचे राज्यपाल कोश्यारी यांना पत्र

Next

मुंबई : येणाऱ्या काळामध्ये राज्यपालांनी कुणालाही मंत्री म्हणून शपथ देऊ नये आणि या सरकारला कोणतेही अधिकार देऊ नयेत. हे सरकार काळजीवाहू आहे आणि कोणतेही लाभाचे पद किंवा कोणतीही शपथ देणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अवैध ठरेल, असे पत्र शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे.

शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले की, आमचे नेते सुभाष देसाई यांनी हे पत्र दिले आहे. शिंदे गटातील आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे आणि त्यावर सुनावणी व्हायची आहे. सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र घटनापीठापुढे ही सुनावणी घेईल. तोपर्यंत हे सरकार आणि मुख्यमंत्रिपद बेकायदा आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये राज्यपालांनी कुणालाही मंत्री म्हणून  शपथ देऊ नये आणि या सरकारला कोणतेही अधिकार देऊ नये. 

सर्वोच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी युक्तिवाद करू नये. आम्ही वेगळे घटनापीठ स्थापन करू, असे सांगितले, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले.  

Web Title: It is unconstitutional for you to swear in anyone as a minister a letter to Shiv Sena Governor bhagat singh Koshyari maharashtra political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.