मागे खंजीर कुणी खुपसले? पक्क माहीत; तुम्ही 'या' भूमिकेवर या, मराठा डोक्यावर घेऊन नाचेल! जरांगे यांचा सरकारला नवा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 11:51 AM2024-06-23T11:51:17+5:302024-06-23T11:55:53+5:30
"मागचे पाढे गिरवत बसण्यापेक्षा, मागे खंजीर कुणी खुपसले आहेत? हे मराठ्यांना पक्क माहीत आहे. १६ टक्के आरक्षण देऊन मराठ्यांचे वाटोळे कुणी केले? हेही मराठ्यांना माहीत आहे."
मागचे पाढे गिरवत बसण्यापेक्षा, मागे खंजीर कुणी खुपसले आहेत? हे मराठ्यांना पक्क माहीत आहे. १६ टक्के आरक्षण देऊन मराठ्यांचे वाटोळे कुणी केले? हेही मराठ्यांना माहीत आहे. पण तुम्हीही त्याच पावलावर पाऊल ठेवून चाललात. नुसते देतात आणि ६ महिन्यांत उडाले. असे म्हणत, "आम्हाला कणखर वागावेलागणार आहे. मराठ्यांना जो न्याय तोच ओबीसींना न्याय. आम्हाला १९९४ ला दिलेल्या किंवा १९६७ नंतर घातलेल्या सर्व जाती उडवाव्या लागणार आहेत. नसता मराठ्यांना न्याय द्यावा लागेल. या भूमिकेवर या, मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल," असा सल्ला मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारासोबत बोलत होते.
जरांगे म्हणाले, "मागचे पाढे गिरवत बसण्यापेक्षा, मागे खंजीर कुणी खुपसले आहेत? हे मराठ्यांना पक्क माहीत आहे. १६ टक्के आरक्षण देऊन मराठ्यांचे वाटोळे कुणी केले? हेही मराठ्यांना माहीत आहे. पण तुम्हीही त्याच पावलावर पाऊल ठेवून चाललात. नुसते देतात आणि ६ महिन्यांत उडाले. लोकांना छाती ठोकूण म्हणताच येईनना की, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला आपलं आरक्षण दिलं, आपलं वाटोळं केलं. पण तुम्ही दिलं ते वर्षभर टिकले अथवा पिढ्यानंपार टिकले, असे मराठ्यांना छाती ठोकून सांगताच येईनना, त्यामुळे दोघेही सारखेच झालेना तुम्ही, एका पारड्यातले."
हैदराबादचं गॅझेट १३ तारखेच्या आत लावा -
"आम्हाला असं छाती ठोकून सांगायला माणूसच नाही राहिला की, यांनी आयुष्याचं दिलंय मराठ्यांना. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तर तुम्हाला माझी भाषाच कळत नाहीय. की शिंदे साहेब फडणवीस साहेब तुम्ही आमचं सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं गॅझेट १३ तारखेच्या आत लावा. सातारा संस्थानचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं लावा," असा सल्लाही मनोज जरांगे यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला.
...आणि तुम्ही छाती ठोकूण सांगाना, सरकारी नोंदी आहेत, ते द्यावे लागणार -
"१९६७ च्या कायद्यानुसार ओबीसींना आरक्षण दिले आहे. ओबीसीमध्ये ज्या जाती घातल्या. त्यात ८३ क्रमांकावर मराठा आहे, कुणबी आहे. पोट जात म्हणून मराठ्यांना आरक्षण द्या. बाकिच्यांना तुम्ही दिलं आहे पोटजात म्हणून. असलं आरक्षण द्या आणि तुम्ही छाती ठोकूण सांगाना, सरकारी नोंदी आहेत, ते आम्हाला द्यावे लागणार आहे. जातीवाद होवो अगर न होवो. पण आम्ही सरकार आहोत. आम्ही मराठ्यांवरही अन्याय करणार नाही आणि ओबीसींवरही अन्याय करणार नाही. ज्या सरकारी नोंदी आहेत त्या नोंदी देणार," असे जरांगे म्हणाले.
...तर मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल -
"जशा १९६७ ला १८० जाती घेतल्या. त्यानंतर, ३००-४०० पोट जाती म्हणून घेतल्या. तशीच कुणब्याची पोट जात म्हणून मराठा आम्ही घेणार आहोत. नसता आम्हाला कणखर वागावेलागणार आहे. मराठ्यांना जो न्याय तोच ओबीसींना न्याय. आम्हाला १९९४ ला दिलेल्या किंवा १९६७ नंतर घातलेल्या सर्व जाती उडवाव्या लागणार आहेत. नसता मराठ्यांना न्याय द्यावा लागेल. या भूमिकेवर या, मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल," असेही जरांगे यावेळी म्हणाले.