रुग्णाला केस पेपर रेकॉर्ड देणे बंधनकारक!

By admin | Published: January 11, 2016 01:52 AM2016-01-11T01:52:52+5:302016-01-11T01:52:52+5:30

माहितीच्या अधिकारात माहिती उघड; केंद्रीय आयुष विभागाचे कौन्सिलला आदेश.

It is mandatory to give the patient with a case paper record! | रुग्णाला केस पेपर रेकॉर्ड देणे बंधनकारक!

रुग्णाला केस पेपर रेकॉर्ड देणे बंधनकारक!

Next

बुलडाणा: आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांकडून उपचार घेणार्‍या रुग्णांना प्रीस्क्रिप्शन तसेच केस पेपर रेकॉर्ड दिले जात नाही. त्यामुळे नेमके कोणते उपचार सुरू आहेत, हे रुग्णाला समजत नसल्याने आता केंद्रीय आयुष विभागाने या दोन्ही पॅथीच्या कौन्सिलला पत्राद्वारे आदेश देऊन रुग्णाला ह्यप्रीस्क्रिप्शनह्णसह रेकॉर्ड दाखविणे बंधनकारक केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील ङ्म्रेयांश बागडे या तरुणाने माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती उघडकीस आली. ग्रामीण भागात अँलोपॅथीच्या डॉक्टरांची कमी मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे अनेक रुग्ण औषधोपचारासाठी आयुर्वेद, तसेच होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडे जातात. रुग्णाला बरे वाटावे यासाठी डॉक्टरांकडून विशिष्ट औषधी दिली जाते. उपचारानंतर सुरुवातीला रुग्णाला चांगले वाटू लागते; मात्र काही दिवसांनी त्याचे रुग्णाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसते, असे माहिती अधिकाराच्या माध्यमातून श्रेयांश बागडे यांनी म्हटले होते. यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टर रुग्णांवर नेमके कोणते उपचार करतात, कोणती औषधे देतात, याविषयी फारसे ज्ञान नसल्याने गोंधळ उडतो. याकडे केंद्रीय आयुष विभागाचे त्यांनी लक्ष वेधले होते. आयुष विभागाने माहिती अधिकारातील या पत्राची गंभीर दखल घेतली. रुग्णाला त्यांच्या तपासणीचे रेकॉर्ड दाखविणे अथवा देणे हा रुग्णाचा हक्क आहे, असे आदेश देण्यात आले आहे.

Web Title: It is mandatory to give the patient with a case paper record!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.