‘नीट’ तीनदा देता येणे शक्य

By admin | Published: February 5, 2017 01:44 AM2017-02-05T01:44:24+5:302017-02-05T01:44:24+5:30

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा प्रयत्न करून अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना, आता ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ने

It is possible to give 'nit' thrice | ‘नीट’ तीनदा देता येणे शक्य

‘नीट’ तीनदा देता येणे शक्य

Next

मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा प्रयत्न करून अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना, आता ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ने (एमसीआय) घेतलेल्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रवेश परीक्षा दिलेले विद्यार्थी २०१७ मध्ये होणाऱ्या ‘नीट’ला बसू शकतात. या आधी विद्यार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या, आता हा प्रश्न सुटलेला आहे.
२०१७ मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तीन फेऱ्या यापुढे ग्राह्य धरल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे सर्वच विद्यार्थ्यांना सलग तीन वर्षे ‘नीट’ द्यायला मिळणार आहे. या आधी केंद्रीय प्रवेश परीक्षा देणाऱ्यांना ‘नीट’ परीक्षेसाठी कमी संधी होती अथवा संधी नव्हती. कारण तीनपेक्षा अधिक वेळा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी होत्या. या तक्रारी आल्यानंतर एमसीआयने हा निर्णय घेतला आहे. या आधी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ‘नीट’च्या संधी कमी झाल्या होत्या अथवा तीनपेक्षा अधिक वेळा परीक्षा दिलेल्यांना ‘नीट’साठी अपात्र ठरवण्यात आले होते, पण आता हा प्रश्न सुटला आहे.
यंदापासून ‘नीट’ सुरू करण्यात आली आहे. या आधी एआयपीएमटी या केंद्रीय परीक्षेद्वारे केंद्राच्या अखत्यारितील वैद्यकीय महाविद्यालये, राज्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील अखिल स्तरावरील कोटा इत्यादी ठरावीक जागांवरील प्रवेश होत. आता या परीक्षेऐवजी नीट घेण्यात येणार आहे. देशातील सरकारी, खासगी, अभिमत वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ परीक्षा ग्राह्य धरली जाणार आहे.
एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट (यूजी) परीक्षेसाठी १ मार्चपर्यंत विद्यार्थी आॅनलाइन फॉर्म भरू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून देशभरात १ हजार ५०० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी नीट-१ आणि नीट-२ परीक्षेसाठी ८ लाख २ हजार ५९४ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेविषयी आणि आॅनलाइन फॉर्मविषयी अधिक माहिती ६६६.ूु२ील्लीी३.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)

Web Title: It is possible to give 'nit' thrice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.