' हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे निंदनीय’, काँग्रेसचे डॉ. आशिष देशमुख यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 08:33 PM2021-11-25T20:33:16+5:302021-11-25T20:34:03+5:30

winter session of maharashtra assembly 2021 : हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न होणे हे निंदनीय आहे. नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायला पाहिजे, असा नियम आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते Ashish Deshmukh यांनी राज्यातील सत्ताधारी Mahavikas Aghadi सरकारवर केली आहे.

'It is reprehensible that winter session is not held in Nagpur', Congress's Dr. Ashish Deshmukh's Mahavikas Aghadi is at home | ' हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे निंदनीय’, काँग्रेसचे डॉ. आशिष देशमुख यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर 

' हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे निंदनीय’, काँग्रेसचे डॉ. आशिष देशमुख यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर 

Next

नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश यावेळी मुंबईतच होणार आहे. याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. दरम्यान, हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न होणे हे निंदनीय आहे. नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायला पाहिजे, असा नियम आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

आशिष देशमुख महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर टीका करताना म्हणाले की,  “विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे डिसेंबर’२१ मध्ये मुंबई येथे करणार असल्याचं राज्य सरकारचं नियोजन असून त्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. खरंतर नागपूर कराराप्रमाणे हे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायला पाहिजे होतं. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे हे अधिवेशन मुंबईलाच झाले होते. मागील पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर येणारे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ पासून नागपूरला होईल, अशी घोषणासुद्धा करण्यात आली होती. असे असतांनादेखील हे अधिवेशन मुंबई येथे घेण्यात येणार आहे. मुंबई येथे विधिमंडळाचे अधिवेशन घ्यायचे असल्यास, अधिवेशनाच्या ४५ दिवस आधी नियमानुसार विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होऊन मुंबईच्या अधिवेशनावर शिक्कामोर्तब केल्या जाते. परंतु तसे काही झालेच नाही, असे आशिष देशमुख म्हणाले.

नागपूर कराराचा सन्मान म्हणून, विदर्भाच्या विकासासाठी असलेली प्रतिबद्धता सिद्ध करण्यासाठी आणि या प्रदेशाच्या प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे हे हिवाळी अधिवेशन दरवर्षी व्हावे, असा नियम आहे. विदर्भातील उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकरी आत्महत्या, सिंचन, पर्यटन, गुंतवणूक, सर्वांगीण विकास असे अनेक प्रश्न प्रलंबित असून यावर उपाय-योजना काढण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्व आहे. नागपूर करारानुसार हे हिवाळी अधिवेशन ज्या हेतूसाठी भरवले जाते, तो हेतू त्यातून पूर्णत्वास जात नसेल तर विदर्भाचा विकास होणारच नाही’’, अशा शब्दात देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली.

“विदर्भातील २ कोटी जनतेच्या दृष्टीने नागपूरला हे अधिवेशन न होणे, ही निंदनीय बाब आहे. यावर्षीसुद्धा हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार नाही. तेव्हा आता मार्च’२२ मधील ‘बजेट अधिवेशन’ किमान २ महिने नागपूरला घ्यावे आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने त्यात भरीव अशी तरतूद करून द्यावी, अन्यथा हे सरकार विदर्भाप्रती असंवेदनशील आहे, असा जनतेचा समज होईल. हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे ही निंदनीय बाब आहे आणि या कृतीचा आम्ही वैदर्भीय जनता निषेध करीत आहे”, असा संताप आशिष देशमुख यांनी व्यक्त केला. 

Web Title: 'It is reprehensible that winter session is not held in Nagpur', Congress's Dr. Ashish Deshmukh's Mahavikas Aghadi is at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.