तब्बल पन्नास दिवसांनी लागला खुनाचा छडा

By admin | Published: May 30, 2016 01:33 AM2016-05-30T01:33:30+5:302016-05-30T01:33:30+5:30

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील शीतल नर्सरीमधील लॉनवर ६ एप्रिल रोजी मृतावस्थेत आढळून आलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली

It took fifty days to get rid of the murder | तब्बल पन्नास दिवसांनी लागला खुनाचा छडा

तब्बल पन्नास दिवसांनी लागला खुनाचा छडा

Next


लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील शीतल नर्सरीमधील लॉनवर ६ एप्रिल रोजी मृतावस्थेत आढळून आलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली आहे. गुन्हे शोध पथकाला त्याच्या खुन्यास तब्बल पन्नास दिवसांच्या अथक तपासानंतर पकडण्यात यश आले आहे. हा खून मद्य पिण्याच्या कारणांवरून झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शीतल नर्सरीमध्ये शिवाजी बापूराव जवादे (वय ४५, रा. पिंपळे गुरव, सांगवी, पुणे) यांचा खून केल्याप्रकरणी मच्छिंद्र विष्णू गर्जे (वय २७, रा. बावी, ता. आष्टी, जि. बीड) यास अटक केली आहे. हा प्रकार ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंह परदेशी यांनी फिर्याद दिली होती. ते लोणी काळभोर पोलीस ठाण्यात असताना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शीतल नर्सरीचे मालक भालचंद्र महादेव टिळेकर यांनी याबाबत माहिती दिली होती.
परदेशी यांनी पथकासमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी करून माहिती घेतली असता नर्सरीमध्ये कामास असलेला कामगार विठ्ठल ऊर्फ तानाजी पिसे यास हा इसम ११ वाजण्याच्या सुमारास लॉनवर मयत स्थितीत आढळून आला. त्यामुळे खून करणाऱ्या इसमाने कसलाही धागादोरा मागे न सोडल्याने याचा छडा लावून खुन्यापर्यंत पोहोचणे जिकिरीचे काम होते. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी याप्रकरणी विशेष सूचना देऊन हा तपास गुन्हे शोध पथकाकडे दिला. पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार पोलीस हवालदार समीर चमनशेख, बाळासाहेब चोरामले, रवी देवकाते, स्वप्निल अहिवळे, संतोष साठे यांच्यासमवेत या गुन्ह्याचा व्यवस्थित अभ्यास केला. त्यांना मयताच्या शर्टवर एक टेलरमार्क मिळाला. त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो कर्नाटकमधील निघाला. पोलीस पथकाने तेथे जाऊन चौकशी केली असता या टेलरचे दुकान सांगवी, पुणे येथे होते, ते दोन वर्षांपूर्वी बंद केल्याचे त्याने सांगितले. या खूनप्रकरणातील मयत व्यक्ती हा सांगवी परिसरातील असावा, असा अंदाज असल्याने या पोलीस पथकाने मयताचे फोटो व वर्णनाची भित्तीपत्रके या परिसरात चिकटवली. परंतु त्याचे नातेवाईक मुंबई येथे, तर पत्नी सहा महिन्यांपासून माहेरी रहात असल्याने त्यांना या प्रकाराची माहिती नव्हती, म्हणून त्यांनी हरवल्याची तक्रार दिली नव्हती. ही बाब पोलीस मित्र गौरव टन्नू यांनी सांगताच त्याच्याशी संपर्क साधला व ते आल्यानंतर मयताची ओळख पटली. परंतु त्याचा खुनी मात्र मोकाट फिरत होता. गुढीपाडव्याचे दिवशी थेऊर येथे गर्जे हा मद्याच्या धुंदीत मी खून केला असे ओरडत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो बीड येथे गेला असल्याचे समजले. परंतु तो वाघोली येथे येणार असल्याचे समजल्याने तेथे सापळा रचला त्यात तो अलगद अडकला. (वार्ताहर)

Web Title: It took fifty days to get rid of the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.