यशवंतरावांच्या कर्मभूमीत संघर्ष यात्रा काढणे हे दुर्दैव - अजित पवार
By Admin | Published: April 27, 2017 07:49 PM2017-04-27T19:49:10+5:302017-04-27T19:58:35+5:30
यशवंतरावांच्या कर्मभूमीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढावी लागते, हे राज्यातील शेतकऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल
> आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 27 - ‘ज्या यशवंतराव चव्हाण यांनी पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. त्या यशवंतरावांच्या कर्मभूमीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढावी लागते, हे राज्यातील शेतकऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. जोपर्यंत हे सरकार शेतकºयांची कर्जमाफी करीत नाहीत तोपर्यंत सरकार विरोधातील हा संघर्ष सुरूच ठेवणार आहोत,’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी काढलेल्या तिसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रेचे आज कऱ्हाडात आगमन झाले. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात आयोजित जाहीर सभेते ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, समाजवादीचे आमदार अबू आझमी, आमदार जयंत पाटील, आमदार पतंगराव कदम, आमदार दिलीप सोपल, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुमनताई पाटील, आमदार प्रणिती शिंदे, प्रवीण गायकवाड, आमदार आनंदराव पाटील, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण, प्रकाश गजभिसे, राहुल नार्वेकर, जोगेंद्र कवाडे, शशिकांत शिंदे आदींसह आमदारांची उपस्थिती होती.
अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम सध्या विरोधी पक्षातील नेत्यांकडून केलं जातंय. सत्ता ही सर्वसामान्याच्या विकासासाठठी राबवायची असते. दिवंगत राजीव गांधी यांच्यानंतर तीस वर्षांनी पूर्ण बहुमत सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले. मोदी यांना निवडून दिल्यानंतर लोकांना वाटले की आता अच्छे दिन येणार. मात्र, या सरकारने कुठे अच्छे दिन आणलेत. या सरकारने दर वाढवून लोकांना महागाईचेच दिन दाखवले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न जर सोडवता येत नसतील, दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नसतील तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कशाला पदावर बसले आहेत? जोपर्यंत दिलेली आश्वासने हे सरकार पूर्ण करणार नाही तोपर्यंत सरकारविरोधी हा संघर्ष सुरूच ठेवणार आहे.
सुनील तटकरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हे सरकार नकाराची घंटा वाजवत आहे. मात्र, या सरकारला कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला लावणार आहोत. हा संघर्ष यात्रेचा लढा अधिक तीव्र करणार आहोत.
अबू आझमी म्हणाले, ह्यशेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सरकार मात्र, अजूनही गप्प बसत आहे. काहीच करीत नाही. उत्तरप्रदेशातील उत्पन्न हे महाराष्ट्रापेक्षा कमी असूनही तेथील मुख्यमंत्री कर्जमाफी करीत असतील तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना हे का जमत नाही. यावेळी डॉ. पतंगराव कदम, जोगेंद्र कवाडे यांनी मनोगते व्यक्त केली.
आता गप्प बसू नका : पृथ्वीराज चव्हाण
ह्यशेतीतील वाढलेल्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. यापूर्वी विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. आता हे आत्महत्येचे लोण पश्चिम महाराष्ट्रातही आले आहे. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातही वडगाव हवेली, मसूरसारख्या गावांतील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जात नसल्याने याविरोधात संघर्ष यात्रा काढावी लागत आहे. संघर्ष यात्रा येथून पुढे गेल्यानंतर गप्प राहू नका, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उभारण्यात आलेल्या लढ्यात सहभागी व्हा,ह्ण असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
१ मेच्या ग्रामसभेत कर्जमाफीचा ठराव करा !
महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करू लागला आहे. याविरोधात विरोधी पक्षातील सर्व आमदारांनी संघर्ष यात्रा काढली आहे. प्रत्येक शेतकऱ्यानेही या लढ्यात सहभागी होणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता १ मे रोजी महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रासभेत कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, असे शेतकरी हिताविरोधी ठराव ह्ण असे प्रतिपादन आमदार आनंदराव पाटील यांनी केले.