मराठा आरक्षण देण्याचे फडणवीसांनीच पुढे आणलेले, त्यामुळेच समाज रस्त्यावर; वडेट्टीवारांचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 01:24 PM2023-10-15T13:24:04+5:302023-10-15T13:24:24+5:30

समृद्धीत भ्रष्टाचार झालाय हे कोणी नाकारू शकत नाही - विजय वडेट्टीवार

It was Fadnavis who brought forward the Maratha reservation issue, that's why the society is on the street; Allegations of the Vijay Vadettivars | मराठा आरक्षण देण्याचे फडणवीसांनीच पुढे आणलेले, त्यामुळेच समाज रस्त्यावर; वडेट्टीवारांचे आरोप

मराठा आरक्षण देण्याचे फडणवीसांनीच पुढे आणलेले, त्यामुळेच समाज रस्त्यावर; वडेट्टीवारांचे आरोप

समृद्धीचे काम अर्धवट असताना सर्व सुविधा सुरू झाल्यानंतर हा रस्ता सुरू करण्याची गरज होती. त्या मार्गावर रेस्ट रूम नाही, विश्रांती घेण्यासाठी सुविधा नाहीत.  समृद्धीत भ्रष्टाचार झालाय हे कोणी नाकारू शकत नाही. घाई गडबडीत काम करण्यात आले. त्यामुळे निष्पाप लोकांचा बळी आज जात आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

सदोष काम नाही, यात तांत्रिक अडचणी आहेत. हे अपघात सरकारच्या घाईमुळे होत आहेत. समृद्धीची वाहतूक थांबवावी समृद्धीमार्ग सुरू ठेवायचा की नाही यावर विचार झाली पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

मागणी केली की असे आरक्षण जाहीर करता येत नाही. सरकारने वेळ देऊन फसवणूक का केली, सरकार खेळवत ठेवण्याचे काम करत आहे. मराठा समाजाला आराक्षण देण्याचा विषय देवेंद्र फडणवीस यांनीच पुढे आणला होता. त्यावेळेस तुम्ही आश्वासन का दिले हे त्यांनी सांगितले पाहिजे. त्यांनी आश्वासन दिल्यामुळे आज हा समाज रस्त्यावर आला आहे. त्याचवेळी आरक्षण देऊ शकत नाही असे जर सांगितलं असतं सिद्ध करता आले असते. आज हा एवढा विषय चिघळला नसता, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी फडणवीसांवर केली आहे. 

उद्या नागपुरात विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांची अकरा वाजता बैठक होणार आहे. यात 40 संघटना असणार आहेत. आरक्षण 10 दिवसात देता येतं का? पुन्हा तोंडाला पान पुसली जाताय का?  ही जबाबदारी सरकारची आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नये. वारंवार भूमिका बदलणारे अनेक नेते तयार झालेले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

सदावर्ते कुणाचा माणूस आहे हे दरेकर यांनी सांगावे. कुठली चाचणी करता येईल तर तेही करून पाहावे. सदावर्ते नेमका कोणाचा? आरोप करण्यापेक्षा कोणाची भाषा बोलत आहे ते पहा. सदावर्ते हे सरकारची भाषा बोलत आहेत. हे लपून राहिलेले नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. 
 

Web Title: It was Fadnavis who brought forward the Maratha reservation issue, that's why the society is on the street; Allegations of the Vijay Vadettivars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.