भाजपाला आता 'चल हट' म्हणण्याची वेळ आली - उद्धव ठाकरे
By admin | Published: February 18, 2017 08:24 PM2017-02-18T20:24:59+5:302017-02-18T20:57:36+5:30
भाजपाची 'ती' जाहिरात पाहिली, ही कोणती संस्कृती आहे असे विचारत आता भाजपालाच 'चल हट' म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - भाजपाची 'ती' जाहिरात पाहिली, ही कोणती संस्कृती आहे असे विचारत आता भाजपालाच 'चल हट' म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. बीकेसीमधील जाहीर सभेते ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीकास्त्र सोडले. पुण्यातील मुख्यमंत्र्यांची आजची सभा पारदर्शी होती, लोक खुर्च्यांवर बसले होते, पण दिसतच नव्हते, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना मारला.
उद्धव यांच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे :
- पुण्यातील मुख्यमंत्र्यांची आजची सभा पारदर्शी होती, लोक खुर्च्यांवर बसले होते, पण दिसतच नव्हते.
- टीका करायची असेल तर करा, पण माझ्या सोन्यासारख्या मुंबईची अवहेलना करू नका
- आरोग्य शिबीरात मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासणार.
- भाजपला आता 'चल हट' म्हणण्याची वेळ आली आहे.
- मुंबईत जोवर शिवसेना आहे तोवर मुबंई सुरक्षित राहणार.
- तुम्ही म्हणता की, औकात दाखवू, आमचे कपडे उतरवू, 23 तारखेला बघा मुंबईकर तुमचं काय करतात.
- कल्याण-डोंबिवलीला 6500 कोटी देऊ म्हणाले, अजून एकही रुपया दिलेला नाही.
- फडणवीस फक्त थापा मारत सुटले आहेत.
- जो तुमच्या विरोधात बोलतो त्याला तुम्ही देशद्रोही ठरवता. 'सामना'ने यांना बेजार केलं आहे. त्यामुळेच बंदीची मागणी, ही आणीबाणी नाही तर काय?
- शरद पवारांना पद्मविभूषण देऊ शकता मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना अजूनपर्यंत 'भारतरत्न' का दिले नाही?
- 'राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे!' हा टिळकांचा अग्रलेख सापडल्यास उद्या सामनामध्ये छापा.
- आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याआधी तुमचं मंत्रीमंडळ किती बरबटलेलं आहे ते बघा आधी !
- मुंबईत जलबोगदे आम्ही केले, तुमच्या खालून हे बोगदे कधी गेले ते तुम्हाला कळलं देखील नाही !
- आम्ही जनतेच्या पैशाला कधी हात लावला नाही आणि लावणारही नाही !
- आम्ही जनतेच्या पैशाला कधी हात लावला नाही आणि लावणारही नाही !
- स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या क्रांतीकारकांचं दालन मुंबईत बनवणार
- मोदींनी यांनी चरख्यावरुन गांधीजींना हटवलं आहेच. त्यामुळे मोदीच देशाचे राष्ट्रपिता होते असं जनतेला वाटेल.
- मोदी स्वत: 10 लाखाचा कोट घालतात आणि मनमोहन सिंह यांचं रेनकोट पाहतात.
- मी काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा विरोध करणार आणि सत्यासाठी, चांगल्यासाठी भाजपचाही विरोध करणार .