पहिल्याच दिवशी जरांगेंनी शरद पवारांवर टीका केली असती, तर...; नितेश राणेंचा मराठा आंदोलनाच्या नेत्याला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 01:23 PM2024-08-14T13:23:47+5:302024-08-14T13:24:05+5:30

Nitesh Rane: मनोज जरांगे यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही, त्यांनी राजकीय भाष्य टाळणे त्यांच्यासाठी चांगले आहे. - नितेश राणे

It was time to pack up Uddhav Thackeray and send him to London; Nitesh Rane's also advice to Manoj Jarange patil | पहिल्याच दिवशी जरांगेंनी शरद पवारांवर टीका केली असती, तर...; नितेश राणेंचा मराठा आंदोलनाच्या नेत्याला सल्ला

पहिल्याच दिवशी जरांगेंनी शरद पवारांवर टीका केली असती, तर...; नितेश राणेंचा मराठा आंदोलनाच्या नेत्याला सल्ला

महाराष्ट्र द्वेषाचा ठेका उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. एकदाचे पॅकअप करून त्यांना कायमचे लंडनला पाठवण्याची वेळ आली आहे, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसेच त्यांनी मनोज जरांगे यांना मोलाचा सल्लाही दिला आहे.

अकोल्यात हिंदू बाहुबली संमेलनासाठी ते नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मत मांडले. पोलीस विभागातील काही अधिकारी हिंदू समाजातील लव्ह जिहादचे विषय आल्यास 10 ते 15 दिवस केस दाखल करत नाहीत. मुलीच्या आई वडिलांसोबत गैरव्यवहार करत आहेत. या अधिकाऱ्यांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव खराब होते, अशा सडक्या आंब्यांना मी इशारा दिलेला आहे, असे राणे म्हणाले. 

आमदारांना म्हाडा घराची लॉटरी बाबत बोलताना त्यांनी अशी काही उदाहरणं असतील तर संबंधित आमदारांनी भूमिका जाहीर करावी, काही सामान्य घरातील व्यक्ती आमदार होतात, पण सगळेच आमदार आर्थिक सक्षम नसतात, असे राणे म्हणाले. 

बहीणीविरोधात बायकोला निवडणुकीला उभे करायला नको होते, असे वक्तव्य अजित पवार यांनी नुकतेच केले होते. यावर विचारले असता नितेश राणे म्हणाले की, अजित पवार अनुभवी नेते आहेत. कुठल्यातरी अनुभवाणे हे मत व्यक्त केले असेल. त्यामुळे महायुतीवर काही परिणाम होणार होईल असे इमले बांधणे चुकीचे आहे. एका वक्तव्याने महायुतीच्या बाहेर पडतील असे काही नाही, असे राणे म्हणाले. 

मनोज जरांगे यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही, त्यांनी राजकीय भाष्य टाळणे त्यांच्यासाठी चांगले आहे. ते मराठा आरक्षणाविषयी बोलतील तेवढे त्यांच्या हिताचे आहे. सर्वच नेत्यांची स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असल्यास त्यावर जरांगे यांनी भूमिका जाहीर करावी. शरद पवारांवर टीकेची जरांगे यांनी पहिल्या दिवशी अशी भूमिका घेतली असती ना तर लोकांना विश्वास बसला असता. आता चारही दरवाजे बंद झाले आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली. 

Web Title: It was time to pack up Uddhav Thackeray and send him to London; Nitesh Rane's also advice to Manoj Jarange patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.