महिला दिनी ‘ती’ ठरली हुंडाबळीची शिकार, धक्कादायक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 07:12 AM2018-03-10T07:12:56+5:302018-03-10T07:12:56+5:30

कुटुंबियांच्या विरोधात जाऊन बबिताने प्रेमविवाह केला. मात्र, सासू-सासºयांना हुंडा देणारी सून हवी असल्यामुळे त्यांचाही या विवाहाला विरोध होता. लग्नाच्या काही दिवसांतच बबिताचा शारिरीक, मानसिक छळ सुरु झाला. ती चार महिन्याची गर्भवती राहिली.

 It was a woman's day that she was a victim of dowry, a shocking reality | महिला दिनी ‘ती’ ठरली हुंडाबळीची शिकार, धक्कादायक वास्तव

महिला दिनी ‘ती’ ठरली हुंडाबळीची शिकार, धक्कादायक वास्तव

Next

- मनीषा म्हात्रे
मुंबई - कुटुंबियांच्या विरोधात जाऊन बबिताने प्रेमविवाह केला. मात्र, सासू-सासºयांना हुंडा देणारी सून हवी असल्यामुळे त्यांचाही या विवाहाला विरोध होता. लग्नाच्या काही दिवसांतच बबिताचा शारिरीक, मानसिक छळ सुरु झाला. ती चार महिन्याची गर्भवती राहिली. अशातच पती आणि सासºयाने ५० हजार रुपयांच्या हुंड्यासाठी तिला मारहाण सुरुवात केली. यातून झालेल्या जखमांवर रुग्णालयात उपचार घेत असतानाच बबिताने महिला दिनी अखेरचा श्वास घेतला. एकविसाव्या शतकात मुंबईसारख्या शहरातही विवाहितेचा हुंड्यासाठी छळ होतोय ही धक्कादायक बाब आहे. पोलिसांनी याबाबत दिलेली आकडेवारीही काहीशी बोलकी आहे. त्यामुळे महिला आपल्या राहत्या घरात तरी सुरक्षीत आहेत का, हाच सवाल येथे उपस्थित होतो. अशाच काहीशा मन हेलाऊन सोडणाºया गोष्टींचा हा आढावा...
माटुंगा परिसरात आई, वडील आणि तीन भावंडासोबत २३ वर्षीय बबिता राहयची. तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन गेल्या वर्षी मे महिन्यात शेजारच्या राजेश सिध्दराम बोडा याच्यासोबत प्रेमविवाह केला. मात्र, लग्नाच्या काही दिवसातच तिचा मानसिक, शारिरीक छळ सुरु झाला. माहेरून ५० हजार रुपये हुंडा घेऊन येण्यासाठी तिच्यामागे तगादा सुरु झाला. तिने याबाबत आई वडीलांना सांगितले. मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखिची असल्याने त्यांना पैसे देणे शक्य नव्हते. तरीही शक्य तितके पैसे देऊ, असे सांगत बबिताच्या आई वडीलांनीही तिच्या सासरच्या मंडळींकडून थोडा वेळ मागितला.
मात्र, बबिताला मारहाण सुरुच राहिली.
मारहाणीला कंटाळून २५ जानेवारीला बबिताने पतिबाबत शाहू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत राजेशला समज दिली.
अशातच बबीता चार महिन्याची गर्भवती राहिली. मात्र, तो काही नमला नाही. महिला दिनी पहाटेच्या सुमारास हुंड्याच्या रक्केमवरुन त्याने वाद घातला आणि बबिताला बेदम मारहाण सुरु केली. राजेशने तिचा गळा आवळला. यामध्ये तिची शुद्ध हरपली. तिला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान तिचा मत्यू झाला.
याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी हुंडाबळी कायद्याअंतर्गत हत्येचा
गुन्हा दाखल करुन पतीसह
सासºयाला अटक केली आहे.
मात्र, या घटनेने सर्वांनाच सुन्न केले. कित्येक महिला दरदिवशी अशा प्रकारातील शिकार ठरत
आहेत. त्यामुळे यावर रोख आणणे गरजेचे आहे.


मांडवातच दिला नकार

मालाडमध्ये राहणाºया १९ वर्षीय गीताचे कळव्यातील आशिष मोहीलाल गुप्ता (२२) सोबत लग्न ठरले. साखरपुडा पार पडल्यानंतर ६ मार्चला लग्नाची तारीख ठरली. मांडव सजला. सुखी संसाराचे स्वप्न रंगवून गीता मांडवात बसली. वडिलांनी जमापूंजी तसेच कर्ज काढून दागिने, घरातील सर्व वस्तू भेटीत दिल्या.
मंगळसूत्र घालण्यापूर्वीच सासूने हॉलसह, दिलेल्या भेट वस्तूंना नावे ठेवण्यास सुरुवात केली. ७० हजार रुपयांचा हुंडा द्या, नाहीतर लग्न मोडले म्हणून समजा, अशी धमकी दिली. वडीलांनी जावयासह सासू सासºयांचे पाय धरले. लग्न मोडू नका म्हणून विनंती केली. लगेच पैसे कुठून आणायचे. थोडा वेळ द्या.. अशी विनवणी सुरु झाली.
नवºयाच्या आईने त्यांच्याच कानशिलात लगावत तेथून निघून गेले. आणि अवघ्या ७० हजार रुपयांच्या हुंड्यासाठी विवाह मोडला. गीताने हार न मानत मालाड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीनुसार नवºयासह सासू-सासºयांना अटक करण्यात आली.


वैचारिक क्रांती
होणे गरजेचे....
आजही हुंड्यासाठी महिलांचा बळी जातो ही खेदजनक आणि गंभीर बाब आहे. गेल्या ४३ वर्षापासून आम्ही या प्रथेविरुद्ध आवाज उचलत आहोत. कायद्यात कठोरता आहे. मात्र त्याबाबतचा धाक अद्याप त्यांच्यापर्यंत हवा तसा पोहचलेला नाही. आजही पैसे, फसवणूक, संशय यामुळे स्त्रीयांची छळवणूक होतच आहे. झटपट पैसा हवा म्हणूनच पालकच हुंड्याच्या माध्यमातून लग्नाचा घाट घालतात. कुठेतरी मुलीनेच हुंडा न घेणाºया जोडीदारालाच पसंती देणे गरजेचे आहे. लग्नानंतर अशी मागणी होत असेल तर तिने पोलिसांकडे धाव घ्यावी. याबाबत वैचारिक क्रांती होणे गरजेचे आहे.
- आशा कुलकर्णी, महासचिव, हुंडाविरोधी चळवळ, मुंबई


समुपदेशनातून मिळाले पुन्हा जगण्याचे बळ
उच्चशिक्षित आणि चांगल्या पगारवाला म्हणून कुटुंबियांनी थाटामाटात नेहाचा (नावात बदल) राकेशसोबत विवाह लावून दिला. सुरुवातीचे काही दिवस छान गेले. त्यांना मुलगा झाला. अशात मुलगा सहा महिन्याचा असताना राकेशला परदेशात जाण्याचे वेड लागले. त्याने नेहाला माहेरून पैसे आणण्याची मागणी सुरु केली.
तिने नकार देताच राकेशसह त्याच्या आई वडीलांकडून तिला मारहाण सुरु झाली. मात्र, ती पैसे न देण्यावर ठाम होती. मानसिक, शारिरीक अत्याचार सुरु झाले. छळाची परिसीमा म्हणजे तिचे केस कापून तिला विद्रूप केले गेले. शिवाय तिला वेडी ठरविण्याचाही प्रयत्न झाला. तिला मानसिक रुग्णाच्या रुग्णालयात भरती केले. ही बाब कुटुंबियांना समजताच त्यांनी नेहाला स्वत:कडे बोलावून घेतले.
नेहाची परिस्थिती पाहून कुटुंबियांनाही धक्का बसला. नेहाला घेऊन तिचे मामा आशा कुलकर्णी यांच्याकडे घेऊन आले. तिला यातून बाहेर काढणे कठीण होते. बरेच दिवस तिचे समुपदेशन त्यांनी केले. सध्या ती एका रुग्णालयात परिचारीका म्हणून कामाला आहे, तर मुलगाही चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहे. समुपदेशनामुळे तिला जगण्याची नवी दिशा मिळाली.

Web Title:  It was a woman's day that she was a victim of dowry, a shocking reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.