...तर स्वाभिमानाचा 'एक्झिट' कधीही बरा!; पंकजा मुंडे राजकारणावर स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 10:13 AM2023-01-09T10:13:02+5:302023-01-09T10:13:47+5:30

राजकारणात तुम्ही स्पष्ट आणि ठाम असाल तर तुमचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

It will not be possible for me to do compromise politics said Pankaja Munde | ...तर स्वाभिमानाचा 'एक्झिट' कधीही बरा!; पंकजा मुंडे राजकारणावर स्पष्टच बोलल्या

...तर स्वाभिमानाचा 'एक्झिट' कधीही बरा!; पंकजा मुंडे राजकारणावर स्पष्टच बोलल्या

googlenewsNext

नाशिक - मला संधी का मिळत नाही याचं उत्तर संधी देणाऱ्यांनी का दिली अन् न देणाऱ्यांनी का दिली नाही तेच देऊ शकतील. मी त्याचे उत्तर देऊ शकत नाही. जर ज्या गोष्टी मनात बाळगून मी राजकारणात आले. त्या समाजासाठी समर्पित करण्याची मला मुभा नसेल तर तडजोडीचं राजकारण करणं मला शक्य होणार नाही. त्यामुळे प्रत्येक किलोमीटरवर हायवेवर एक्झिट असतो तसा स्वाभिमानाचा एक्झिट कधीही बरा असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

नाशिक येथील विद्यार्थ्यांसाठी आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या की, विना स्वाभिमानाची तळी आपल्या ताटात वाढून घेण्यापेक्षा मला राजकारणातून बाहेर पडण्याची भीती कधीही वाटत नाही. कारण माझ्यासाठी हे स्पष्ट आहे. मी ज्या उंचीवर आहे तेथपर्यंत येणे सर्वांनाच जमते असं नाही. आज माझ्या एका ट्विटवर लाखो लोक जमतात. त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो कायम राहावा असे राजकारण मला करता आले पाहिजे अन्यथा नको असं सांगत पंकजा मुंडे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. 

माझ्यात संयम अनुभवाने आला
राजकारणात तुम्ही स्पष्ट आणि ठाम असाल तर तुमचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात मी राहीले आहे. त्यांचे राजकारण मी जवळून पाहिले आहे. ते कधीही कुणासमोर झुकले नाही. तोच वारसा मी पुढे चालवित आहे. माणसाच्या आयुष्यात कोणतीही परिस्थिती कायम रहात नाही. चांगले आणि वाईट दिवस येत जात असतात. फक्त ते संयमाने पार करावे लागतात. माझ्यामध्ये संयम हा अनुभवाने आला आहे. जीवनात येणारे अनुभव संयमाने पचवा ते खूप महत्त्वाचे असते असे मत पंकजा मुंडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.

...तर लेखिका झाले असते
जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मला कधी डॉक्टर, कधी पायलट तर कधी आर्किटेक्चर व्हायचे होते. पण एक मात्र नक्की मला खूप प्रसिद्ध व्हायचे होते. मला क्रिएटीव्ह फील्डमध्ये रहायला नेहमी आवडते. यामुळे मी जर राजकारणी झाले नसते तर लेखिका झाले असते. मला लिहिण्याची आवड लहानपणापासून आहे. सध्या मला आलेल्या अनुभवांवर काही लिहीत आहे. राजकारणात काही वेळा आपण जे बोलू शकत नाही ते मी लिहिणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले. 

त्याचसोबत जीवनात येणाऱ्या संकटांचा विचार करता महाभार- तातील व्यक्तिरेखांच्या अनुषंगाने पाहिले तर आपल्या पित्याचा शब्द कधीही खाली पडू न देणारे भीष्मपितामह होणे मला अधिक आवडेल आणि माझ्या आयुष्यात ते ओघाने आलेच आहे. असेही पंकजाताई म्हणाल्या. 
 

Web Title: It will not be possible for me to do compromise politics said Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.