राजीनाम्याची मागणी केल्याने आयटी कंपनीतील तरुणीची आत्महत्या
By admin | Published: April 25, 2017 09:42 PM2017-04-25T21:42:28+5:302017-04-25T23:47:29+5:30
हिंजवडीतील आयटी कंपनी प्रशासनाने राजीनाम्याची मागणी केल्याने आलेल्या नैराश्यातून आयटी अभियंता तरुणीने
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 25- हिंजवडीतील आयटी कंपनी प्रशासनाने राजीनाम्याची मागणी केल्याने आलेल्या नैराश्यातून आयटी अभियंता तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. नैराश्येपोटी आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले असले तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
पुणे, दि. 25- हिंजवडीतील आयटी कंपनी प्रशासनाने राजीनाम्याची मागणी केल्याने आलेल्या नैराश्यातून आयटी अभियंता तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. नैराश्येपोटी आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले असले तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
मीनल अशोकराव देशमुख (वय २८, रा. अनंतानगर, लक्ष्मी चौक, हिंजवडी, मूळची विदर्भ) असे त्या तरुणीचे नाव आहे. ती पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरी करीत होती. येत्या १८ मे रोजी तिचे लग्न होणार होते. त्यामुळे काही दिवसांपासून ती रजेवर होती. मीनल व प्रियांका या दोघी बहिणी येथील सदनिकेत भाड्याने राहत होत्या. सोमवारी प्रियांका तिच्या कामाला निघून गेली; मात्र तब्येत बिघडल्याने ती दुपारी एकच्या सुमारास घरी आली. तिने दाराची बेल वाजवली; परंतु तिला खोलीतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. विवाह जवळ आला असल्याने सुटीवर असलेली मीनल घरीच असे. बेल वाजवल्यानंतर बराच वेळ प्रतीक्षा करूनही प्रतिसाद न आल्याने प्रियंकाने याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा उघडला. आत खोलीत प्रवेश करताच, दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेली मीनल दिसून आली. तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
परफॉर्मन्स समाधानकारक नाही. त्यामुळे राजीनामा द्यावा, असा कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी मीनलला तगादा लावला होता. स्वत:हून राजीनामा दे अथवा कंपनी व्यवस्थापनाला कारवाई करणे भाग पडेल, असे तिला धमकावले जात असल्याने तिला नैराश्य आले होते. असे मीनलची बहीण प्रियंका हिचे म्हणणे आहे. प्रियंकाच्या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची चिन्ह दिसून येत आहेत. या घटने नंतर पोलिसांनीही कमालीची गुप्तता बाळगली असल्याने संशय बळावला आहे.
कंपनीतील असुरक्षिततेचे काय?
हिंजवडीत रसिला राजू ओपी या आयटी अभियंता तरुणीचा तीन महिन्यांपूर्वी कंपनीत खून झाला. तत्पूर्वी तळवडे सॉफटवेअर कंपनीत काम करणाºया अंतरा दास या तरुणीच्या खुनाची घटना घडली होती. आयटी क्षेत्रात काम करणाºया युवतींचे आत्महत्येचे प्रमाण वाढू लागल्याने नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला होता. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महिला सुरक्षा अभियान उपक्रम राबवून आयटीतील तरुणींशी थेट संवाद साधला होता. त्या वेळी बाहेरील सुरक्षिततेच्या उपाययोजना पोलिसांकडून केल्या जात आहेत. परंतु, कंपनीत काही त्रास असेल तर युवतींनी सांगावे, असेही शुक्ला यांनी सांगितले होते. मात्र, कोणीही आतापर्यंत अशी तक्रार दिली नव्हती़