आयटीआयच्या विद्यार्थ्यांना राबविले मजुरांसारखे

By admin | Published: August 12, 2014 09:02 PM2014-08-12T21:02:36+5:302014-08-12T21:02:36+5:30

विविध ट्रेडचे साहित्य व यंत्र नवीन इमारतीमध्ये हलविण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना मजुरांसारखे राबविल्याचा प्रकार

ITI students like Rabweel laborers | आयटीआयच्या विद्यार्थ्यांना राबविले मजुरांसारखे

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना राबविले मजुरांसारखे

Next

अकोला: अकोल्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध ट्रेडचे साहित्य व यंत्र नवीन इमारतीमध्ये हलविण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना मजुरांसारखे राबविल्याचा प्रकार सोमवारी उजेडात आला. गत तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून साहित्य हलविण्याचे काम करून घेण्यात येत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी दिलेल्या मौखिक आदेशानुसार साहित्य व यंत्र हलविण्यासाठी विद्यार्थ्यांना मजुरासारखे जुंपण्यात आल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील काही इमारती मोडकडीस आल्या आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये असलेलेले विविध विभाग नव्यानेच बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. नवीन इमारतीमध्ये विविध ट्रेडचे विषय शिकविण्यास प्रारंभ झाला आहे. एप्रिल -मे महिन्यामध्ये या नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते. नवीन शैक्षणिक सत्रास प्रारंभ झाल्यानंतर जुन्या इमारतीमधील साहित्य व इतर यंत्रसामग्री नवीन इमारतीमध्ये हलविण्यात येत आहे. हे साहित्य व यंत्र हलविण्यासाठी विद्यार्थ्यांना मजुरांसारखे राबविण्यात येत असल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. आर्किटेक्ट असिस्टंट, ड्राफ्टस्मन सिव्हिल, फॅशन डिझायनिंग, कटिंग स्विंग या चार ट्रेडचे साहित्य आतापर्यंत नवीन इमारतीमध्ये हलविण्यात आले असून, यासाठी विद्यार्थ्यांनाच कामाला जुंपण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ, टीव्ही या दोन ट्रेडचे साहित्य व यंत्रसामग्री हलविण्यासाठी विद्यार्थ्यांना सोमवारी पुन्हा कामाला जुंपण्यात आले. या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली असता, चार ट्रेडची यंत्रसामग्री व साहित्य आम्ही आधीच हलविले, आता आणखी काम करून घेतले आहे, असे त्यांनी सांगितले. यंत्र, संगणक, टेबल, खुच्र्या आणि विविध ट्रेडचे साहित्य विद्यार्थ्यांंनी सोमवारी सकाळपासूनच हलविण्यास सुरुवात केली होती.

** प्राचार्यांनीच दिले मौखिक आदेश
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील साहित्य नवीन इमारतीमध्ये हलविण्यासाठी विद्यार्थ्यांंचा वापर करण्याचे मौखिक आदेश प्राचार्यांंनीच विभागप्रमुखांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांंकडून साहित्य हलविण्याचे काम करून घेण्यात येत आहे.

** साहित्य हलविण्यासाठी मिळते अनुदान
शासकीय औद्योगिक संस्थेतील साहित्य नवीन इमारतीमध्ये हलविण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे या कामासाठी संस्थेने मजूर ठेवले, तरी हरकत नाही. विविध ट्रेडचे साहित्य हलविण्यासाठी जो खर्च लागेल, तो शासनाकडून अनुदान स्वरूपात मिळणारच आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांंकडून हे काम करून घेण्यामागचा उद्देश काय, हा प्रश्नच आहे.

Web Title: ITI students like Rabweel laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.