गडकरींना ‘आयटी’ची क्लीन चिट
By admin | Published: May 13, 2014 03:27 AM2014-05-13T03:27:08+5:302014-05-13T03:27:08+5:30
भाजपाचे नेते नितीन गडकरी यांना प्राप्तिकर विभागाने (आयटी) क्लीन चिट दिली आहे. गडकरींच्या विरोधात आयटी विभागाने काय काय कारवाई केली, अशी माहिती माहितीच्या अधिकारात मागविण्यात आली होती.
नागपूर : भाजपाचे नेते नितीन गडकरी यांना प्राप्तिकर विभागाने (आयटी) क्लीन चिट दिली आहे. गडकरींच्या विरोधात आयटी विभागाने काय काय कारवाई केली, अशी माहिती माहितीच्या अधिकारात मागविण्यात आली होती. त्यावर या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयटी विभागाने गडकरींशी संबंधित कोणत्याही कंपन्यांवर धाडी घातल्या नाही व चौकशीही केली नाही, असे स्पष्ट केले आहे. दिल्ली येथील माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सुमित दलाल यांनी ही माहिती विचारली होती. यूपीए सरकारच्या कार्यकाळात माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे व चुकीचे असल्याचे सिद्ध झाले. सत्य अस्वस्थ होईल, पण पराभूत नाही याचा अनुभव आज मी घेतला. या काळात मला प्रचंड मानसिक त्रास झाला. सार्वजनिक जीवनात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. यूपीए सरकारच्या काळात हे आरोप झाले आणि त्यांच्याच कार्यकाळात मला क्लीन चिट मिळाली, ही फार समाधानाची गोष्ट आहे. (प्रतिनिधी)