दिवाळी नव्हे, हे तर ‘दिवाळे’! उद्धव ठाकरेंचे भाजपावर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 02:59 AM2017-10-09T02:59:15+5:302017-10-09T02:59:47+5:30

जीएसटीतील बदलामुळे देशात ‘दिवाळी’ असल्याचे सांगणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांच्या घरात दिवाळी आहे काय, हे पहावे.

 It's not a Diwali, it's a bust! Uddhav Thackeray's criticism on BJP | दिवाळी नव्हे, हे तर ‘दिवाळे’! उद्धव ठाकरेंचे भाजपावर टीकास्त्र

दिवाळी नव्हे, हे तर ‘दिवाळे’! उद्धव ठाकरेंचे भाजपावर टीकास्त्र

Next

नांदेड : जीएसटीतील बदलामुळे देशात ‘दिवाळी’ असल्याचे सांगणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांच्या घरात दिवाळी आहे काय, हे पहावे. सामान्य माणूस केंद्राच्या विविध धोरणांमुळे अडचणीत आला असताना पंतप्रधानांना मात्र दिवाळीसारखे वातावरण दिसते. ही दिवाळी नव्हे, दिवाळे आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
नांदेड महापालिकेच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारच्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, तीन वर्षांत केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीत सामान्य माणूस उभा राहू शकला नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे व्यापार व्यवस्था ठप्प झाली आहे. विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. कर्जमाफीही राज्यात आॅनलाइनमध्ये अडकली आहे. शेतकºयांवर कर्जाचा डोंगर करायचा आणि मग आम्ही काही तरी केले असे सांगून त्यांच्याच डोक्यावर हात ठेवायचा. शिवसेना सध्या गप्प आहे. याचा अर्थ असे नव्हे की, आम्ही कर्जमाफीचा विषय सोडला. जून २०१७पर्यंतचे शेतकºयांचे सर्व कर्ज माफ झाले पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे.
केंद्र सरकारने आता सौभाग्य योजना जाहीर केली आहे. सध्याच्या ग्राहकांनाच वीज पुरवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. ऐन दिवाळीत प्रकाश आणि सामान्यांच्या घरातील लक्ष्मी सरकारने ओरबाडून घेतली आहे. त्यामुळे आता कशाची पूजा करावी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीची भाजपाला साथ-
नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेनेवर काँग्रेसला मदत केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र आम्ही पाठीमागून नव्हे तर समोर वार करणारे आहोत. राज्यात भाजपा सरकार ही शिवसेनेच्या नव्हे तर राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या पाठिंब्यावर चालत आहे. अदृश्य हातांच्या रुपात सरकारला मदत असल्याचे सरकारकडून वारंवार सांगितले जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी छुप्या पद्धतीने सरकारला पाठिंबा देत आहे, असा दावा करतानाच, मतदान करताना ईव्हीएमवर लक्ष ठेवावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

Web Title:  It's not a Diwali, it's a bust! Uddhav Thackeray's criticism on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.