सासवडच्या मुख्य न्यायाधीशपदी जाधव

By admin | Published: June 10, 2016 01:37 AM2016-06-10T01:37:44+5:302016-06-10T01:37:44+5:30

न्यायदानाची मोठी जबाबदारी पार पाडत असताना कोर्टातील ज्येष्ठ वकील मंडळींना कायम बरोबर घेतले जाईल

Jadhav as Chief Justice of Saswad | सासवडच्या मुख्य न्यायाधीशपदी जाधव

सासवडच्या मुख्य न्यायाधीशपदी जाधव

Next


सासवड : न्यायदानाची मोठी जबाबदारी पार पाडत असताना कोर्टातील ज्येष्ठ वकील मंडळींना कायम बरोबर घेतले जाईल, त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेण्यात येईल. नवीन काम करीत असलेल्या वकील बांधवांना गरज असेल तेथे मार्गदर्शन केले जाईल, त्यांना काम करण्याची संधी देऊन सर्वांना समान राखले जाईल, असे प्रतिपादन सासवड न्यायालयाचे मुख्य दिवाणी न्यायाधीश व्ही. के. जाधव यांनी केले.
सासवड येथील मुख्य दिवाणी न्यायाधीश श्रीकृष्ण इनामदार यांची नुकतीच लातूर जिल्ह्यात बदली झाली. त्यांच्या जागेवर सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर येथील व्ही. के. जाधव यांची नियुक्ती झाली. या निमित्त सासवड बारच्या वतीने अध्यक्ष महेश बारटक्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व खंडेरायांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी या वेळी सह दिवाणी न्यायाधीश व्ही. बी. साळुंखे, न्यायाधीश ए. आर. दिंडे, सरकारी वकील वाखनकर, आढागळे, बारचे उपाध्यक्ष विशाल पोमण, सचिव गणेश उरणे, सहसचिव सागर सावंत, खजिनदार राणी यादव, हिशेब तपासणीस ज्योत्स्ना भूतकर, दिगंबर पोमण, ज्येष्ठ वकील अण्णासाहेब खाडे, बाजीराव झेंडे, बापूसाहेब गायकवाड ,बापूसाहेब जगताप, एस. जी. दामले, राणी यादव, नाझनीन आतार, एल. एन. गायकवाड, एस. आर. इभाड, सुरेश फडतरे, विशाल देव, राजेंद्र पोमण, किरण फडतरे, सुनील कटके, बाळासाहेब जगताप, नंदकुमार शिंदे, सुभाष नाझीरकर, किशोर म्हस्के, धनंजय भोईटे, अशोक देशमुख, कलाताई फडतरे, महेश जाधव, सोनल पंडित, सुदाम सावंत, शिवाजी कोलते, दशरथ घोरपडे, भारती शिंदे, राहुल काळे, पी. एस. जाधव, फरझाना काझी, पूनम शिंदे उपस्थित होते. सह दिवाणी न्यायाधीश साळुंखे यांनीही आतापर्यंत बारच्या सदस्यांनी केलेल्या सहकार्याबद्दलआभार मानले.

Web Title: Jadhav as Chief Justice of Saswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.