जान्हवी गडकर जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

By admin | Published: June 16, 2015 03:39 AM2015-06-16T03:39:20+5:302015-06-16T03:39:20+5:30

फ्री-वे अपघातातील आरोपी जान्हवी गडकर हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज कुर्ला न्यायालयाने १७ जूनपर्यंत तहकूब केली.

Jahnavi Gadkari's bail hearing on application | जान्हवी गडकर जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

जान्हवी गडकर जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

Next

पोलिसांचा तीव्र विरोध : देशाबाहेर पसार होण्याची वर्तवली शक्यता


मुंबई : फ्री-वे अपघातातील आरोपी जान्हवी गडकर हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज कुर्ला न्यायालयाने १७ जूनपर्यंत तहकूब केली. दरम्यान, जामीन दिल्यास जान्हवी परदेशात पसार होईल, साक्षीदारांवर दबाव आणून पुरावे खिळखिळे करू शकेल, अशी भीती पोलिसांनी न्यायालयासमोर व्यक्त केल्याची माहिती मिळते.
कुर्ला न्यायालयाच्या दंडाधिकारी रूचा खेडेकर यांनी आरसीएफ पोलीस व सरकारी वकील यांना जान्हवीला जामीन देण्याबाबत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज आरसीएफ पोलिसांनी वरील मुद्दे न्यायालयाला कळवले.
दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १७ जूनपर्यंत तहकूब केली.
या प्रकरणी पोलिसांनी रिलायन्स कंपनीचे चीफ फायनान्शीअल आॅफिसर अलोक अगरवाल यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. अगरलवाल आणि जान्हवी अपघाताआधी फोर्टच्या आयरीश हाउस बारमध्ये एकत्र होते. जान्हवीसोबची ती भेट अधिकृत आणि कंपनीच्या कामाबाबत होती, असे अगरवाल यांनी आपल्या जबाबात नमूद केल्याची माहिती मिळते. (प्रतिनिधी)

Web Title: Jahnavi Gadkari's bail hearing on application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.