‘जय जय हे महिषासुरमर्दिनी’

By admin | Published: October 2, 2014 05:39 PM2014-10-02T17:39:44+5:302014-10-02T17:39:44+5:30

नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला अंबाबाईची ‘महिषासुरमर्दिनी’ या रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री वाहनात विराजमान झालेल्या अंबाबाईची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली.

'Jai Jai Mahishasurmardini' | ‘जय जय हे महिषासुरमर्दिनी’

‘जय जय हे महिषासुरमर्दिनी’

Next

- अष्टमीला अंबाबाईची पूजा

कोल्हापूर : प्रजेसह देवदेवतांवरही अन्याय अत्याचार केलेल्या आणि सत्तेने उन्मत्त झालेल्या महिषासुराशी घनघोर युद्ध करून दुर्गेने अष्टमीला त्याचा वध केला... ती दुर्गा आदिशक्ती म्हणजे
करवीर निवासिनी अंबाबाई. नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला अंबाबाईची ‘महिषासुरमर्दिनी’ या रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री वाहनात विराजमान झालेल्या अंबाबाईची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली.
नवरात्रौत्सवात अंबाबाईने महिषासुराचा वध केला; त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तंत्रात ‘महारात्री’ म्हणून ओळखली जाणारी ही तिथी. आजच्याच दिवशी जगदंबा आदिशक्तीने विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केला. त्रिलोकाला त्रास देणारा असुर या तिथीला संपला; पण त्याहीपेक्षा ५१ शक्तिपीठांच्या यादीत करवीरसाठी ‘करवीरे महिषमर्दिनी’ असा येणारा उल्लेख सार्थ करणारी आजची ही महातिथीची पूजा म्हणजे महिषासुरमर्दिनी.
ही पूजा सागर मुनीश्वर व रवी माईनकर यांनी बांधली. सर्जेराव निगवेकर, राजेंद्र निगवेकर यांनी मूर्ती घडविल्या, चित्रकार प्रशांत इंचनाळकर, इंद्रजित निगवेकर, सत्यजित निगवेकर यांनी साहाय्य केले.

Web Title: 'Jai Jai Mahishasurmardini'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.