‘जय जिनेंद्र गु्रप’चे निर्विवाद वर्चस्व

By admin | Published: May 24, 2016 02:55 AM2016-05-24T02:55:47+5:302016-05-24T02:55:47+5:30

आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या महाराष्ट्र चतुर्थ झोनमधील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदाच्या सर्व २४ जागांवर मोहनलाल चोपडा व सतीश लोढा यांच्या नेतृत्वाखालील

'Jai Jainendra Gup''s undeniable domination | ‘जय जिनेंद्र गु्रप’चे निर्विवाद वर्चस्व

‘जय जिनेंद्र गु्रप’चे निर्विवाद वर्चस्व

Next

नाशिक : आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या महाराष्ट्र चतुर्थ झोनमधील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदाच्या सर्व २४ जागांवर मोहनलाल चोपडा व सतीश लोढा यांच्या नेतृत्वाखालील ‘जय जिनेंद्र’ ग्रुपने निर्विवाद वर्चस्व मिळवून ‘परिवर्तन पॅनल’चा धुव्वा उडवला़ या सदस्यपदांसाठी नाशिक व अहमदनगर या दोन ठिकाणी रविवारी मतदान झाले होते़
जैन कॉन्फरन्सच्या महाराष्ट्र चतुर्थ झोनमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २४ जागा असून, यासाठी ४९ उमेदवार रिंगणात होते़ नाशिकचे मोहनलाल चोपडा व अहमदनगरचे सतीश लोढा यांच्या नेतृत्वाखालील ‘जय जिनेंद्र ग्रुप’ तसेच अहमदनगरचे अशोक बोरा व नाशिकचे सुभाष घिया यांच्या नेतृत्वाखाली ‘परिवर्तन पॅनलचे’ प्रत्येकी २४ उमेदवार तर एक अपक्ष निवडणूक रिंगणात होते़
जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मान यावर्षी चतुर्थ झोनकडे असून, अध्यक्षपदाचे उमेदवार मोहनलाल लालचंद चोपडा (नाशिकरोड) यांना सर्वाधिक मते मिळाली़ त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा ही दिल्लीतील कार्यालयातून केली जाणार आहे़ महाराष्ट्र चतुर्थ झोनच्या प्रांत अध्यक्षपदी सतीश नारायण लोढा (अहमदनगर) यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत़ या निवडणुकीसाठी प्रांतिय निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड़जवरीलाल घिया तर सहअधिकारी म्हणून अ‍ॅड़ अभय बोरा यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)

जय जिनेंद्र ग्रुपचे विजयी उमेदवार
अजित कचरदास संकलेचा, नाशिकरोड, आनंद रामचंद चोरडिया, पाथर्डी, भिकचंद रामलाल डोशी, औरंगाबाद, चंदनमल बंडूलाल बाफणा, संगमनेर, चंद्रकांत बन्सीलाल रुणवाल, धुळे, दिलीपकुमार केदूलाल टाटीया, सटाणा, जवरीलाल छोटमल भंडारी, नाशिक, कांतीलाल शांतीलाल चोपडा, नाशिक, ललित जवरीलाल मोदी, नाशिक, मदनलाल कुंदनमल लोढा, औरंगाबाद, मनोज मदनलाल सेठीया, अहमदनगर, मिठालाल रतनचंद कांकरिया, औरंगाबाद, नंदकिशोर मंगलचंद साखला, नाशिक, पारसमल इंदरचंद दुगड, धुळे, प्रकाश रावतमल सुराणा, मालेगाव, प्रवीण मदनलाल खाबिया, नाशिक, प्रवीण माणकचंद भंडारी, नारायणगव्हाण, रमेश बन्सीलाल साखला, नाशिक, संजय मनसुखलाल कोठारी, जामखेड, सतीश चांदमल चोपडा, अहमदनगर, शशिकांत शिवचंद पारख, नाशिक, सुभाष लखमीचंद पगारिया, अहमदनगर, वैभव सुंदरलाल नहार, नेवासा, विजय सुवालाल ललवाणी, परळी-बीड.

Web Title: 'Jai Jainendra Gup''s undeniable domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.