जायकवाडी धरणाला नाशिक, नगरचे पाणी
By admin | Published: November 1, 2015 10:03 PM2015-11-01T22:03:23+5:302015-11-01T22:03:23+5:30
तहानलेल्या मराठवाड्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी 2 हजार क्योसेसन पाणी सोडायला सुरवात झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि.०१ - तहानलेल्या मराठवाड्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी 2 हजार क्योसेसन पाणी सोडायला सुरवात झाली आहे. ८ दिवसात जायकवाडी धरणात पाणी पोहचण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नदीकाठची वीज बंद करण्यात आली आहे. पाणी न अड़विण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, तसेच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्मान झाले आहे.
जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यासंदर्भात आज नाशिकमध्ये जिल्हा प्रशासनाची जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली ६ वाजता बैठक झाली. नाशिक जिल्हा प्रशासनाच्या या बैठकीत मराठवाड्याची दुष्काळी परीस्थिती पाहून प्रशासनाने नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणातून आज रात्री गोदावरीत पाणी सोडण्याचा पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा मार्ग शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोकळा केला होता मात्र सोडण्यात येणारे पाणी फक्त पिण्यासाठी आहे असे न्यायालयाने सांगीतल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.