तुरुंगातील कैद्यांना आता मिळणार ‘डायमंड चादर’, सुती कापडाच्या चादरीच मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 06:54 AM2023-11-08T06:54:37+5:302023-11-08T06:54:58+5:30

 कारागृह विभागामध्ये १० ऑक्टोबर रोजी सुरक्षा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्याबाबत बैठक पार पडली.  

Jail inmates will now get 'diamond chadar', cotton cloth sheets only | तुरुंगातील कैद्यांना आता मिळणार ‘डायमंड चादर’, सुती कापडाच्या चादरीच मिळणार

तुरुंगातील कैद्यांना आता मिळणार ‘डायमंड चादर’, सुती कापडाच्या चादरीच मिळणार

मुंबई : कारागृहातील कैद्यांना आता ‘डायमंड चादर’ म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, यामध्ये डायमंड नसून फक्त  १०० टक्के सुती कापडाने बनवलेल्या चादरीचा समावेश असणार आहे. या चादरीचे फक्त नाव ‘डायमंड चादर’ असल्याचे कारागृह विभागाने स्पष्ट केले. 
 कारागृह विभागामध्ये १० ऑक्टोबर रोजी सुरक्षा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्याबाबत बैठक पार पडली.  या बैठकीत कैद्यांना झोपण्याकरिता अंथरूण व पांघरूण देण्याबाबतची सद्य:स्थिती जाणून घेतली असता, काही ठिकाणी पांघरूण (कांबळ) हे कैद्यांसाठी गैरसोयीचे असल्याचे निदर्शनास आले आहे. 

कैदी स्वतः करतात तयार 
कैद्यांच्या सोयीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कारागृहातील कैदी स्वतः हे पांघरूण तयार करणार असल्याचेही अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
लोकरीचे प्रमाण जास्त असल्याने
कांबळ हे सूत,लोकरीपासून तयार करण्यात येते. परंतु, त्यामध्ये लोकरीचे प्रमाण जास्त असल्याने हे पांघरूण कारागृहाच्या भौगोलिक परिस्थितीत कैद्यांना योग्य ठरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कैद्यांना देण्यात येणाऱ्या पांघरुणात सुधारणा करताना ‘कांबळ’ऐवजी कारागृहातच तयार होणारी १०० टक्के सुती ‘डायमंड चादर’ ही पांघरूण म्हणून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Web Title: Jail inmates will now get 'diamond chadar', cotton cloth sheets only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग