कोठेवाडी आरोपींना १२ वर्षे सश्रम कारावास

By Admin | Published: December 23, 2016 04:46 AM2016-12-23T04:46:21+5:302016-12-23T04:46:21+5:30

कोठेवाडी (जि. अहमदनगर) येथील दरोडा व सामूहिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एकूण १३ आरोपींना

Jailwadi accused 12 years rigorous imprisonment | कोठेवाडी आरोपींना १२ वर्षे सश्रम कारावास

कोठेवाडी आरोपींना १२ वर्षे सश्रम कारावास

googlenewsNext

औरंगाबाद : कोठेवाडी (जि. अहमदनगर) येथील दरोडा व सामूहिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एकूण १३ आरोपींना विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी ‘मकोका’ कायद्यांतर्गत प्रत्येकी बारा वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी दहा लाख रुपयांप्रमाणे एकूण एक कोटी तीस लाख रुपये दंड ठोठावला.
तत्कालीन पोलीस निरीक्षक केशव बाबूराव रणदिवे हे पाथर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्या असे निदर्शनास आले की, कोठेवाडी दरोडा व सामूहिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या १३ आरोपींची संघटित गुन्हेगारी करणारी टोळी आहे. या टोळीने अहमदनगरमधील पाथर्डी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, सिल्लेगाव या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात मागील १० वर्षांत दरोडा, बलात्कार आणि सामूहिक बलात्कारासारखे अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. म्हणून तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी एम. एम. बेलदार यांनी या आरोपींविरुद्ध ‘मकोका’ कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा नोंदवून तपासाअंती औरंगाबादच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी एकूण ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. सुनावणीअंती विशेष न्यायालयाने, दारासिंग ऊर्फ मारुती वकिल्या भोसले, रमेश ऊर्फ रेच्या धुपाजी काळे, बंडू ऊर्फ बबन उत्तम भोसले, हबीब ऊर्फ हब्या पानमळ्या भोसले, गारमण्या खुबजत चव्हाण, राजू ऊर्फ अंदाज वकिल्या भोसले, उमऱ्या धनशा भोसले, रसाळ्या डिंग्या भोसले, संतोष ऊर्फ हरी डिस्चार्ज काळे, सुरेश ऊर्फ तरशा चिंतामण काळे, हणमंता नकाशा भोसले, चिकू ऊर्फ चिक्या सरमाळ्या भोसले आणि सुभाष काशीनाथ देसाई-भोसले या १३ आरोपींना मकोकाच्या कलम ३ (१)(२) खाली प्रत्येकी १२ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंड ठोठावला. तसेच कलम ३(४) खालीसुद्धा प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंड ठोठावला. (प्रतिनिधी)

Web Title: Jailwadi accused 12 years rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.